• Sat. Sep 21st, 2024

मोठी बातमी! शरद पवार यांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक, कोण आहे हा तरुण, का दिली धमकी

मोठी बातमी! शरद पवार यांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक, कोण आहे हा तरुण, का दिली धमकी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (३४) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पुण्यातून अटक करण्यात आली. तो आयटी इंजिनीअर आहे. स्थानिक न्यायालयाने आरोपीला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने फेसबुकवर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ नावाचे पेज तयार केले होते. शरद पवार यांना उद्देशून ‘तुम्ही लवकरच दाभोलकर व्हाल’, अशी धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याशिवाय सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलनेही आक्षेपार्ह भाषा वापरून शरद पवार यांची औरंगजेबाशी तुलना करणारा मजकूर पोस्ट केला आहे. या दोन्ही पोस्ट्स व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीने हे प्रकरण गांभीर्याने घेतले.

आणखी एक सरकारी कंपनी विकली जाणार; विभाजन झाले, एक भाग लिस्ट होणार, दुसरा विकण्याची तयारी
सागर बर्वेला अटक

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन आरोपींच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर एलटी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढे हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.

Indigo Flight in Pak: इंडिगो विमान भरकटले, थेट पाकिस्तानात शिरले, या विमानाचे काय झाले?; इंडिगोने केले स्पष्ट
युनिट २ ने इलेक्ट्रॉनिक टेहळणीच्या आधारे सागर बर्वेला अटक केली. दरम्यान सागर बर्वे याने असे कृत्य का केले, यामागे त्याचा उद्देश काय होता याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed