• Sat. Sep 21st, 2024
आयआयटीत शिकण्याचं स्वप्न, ४५ दिवस फुलटाइम अभ्यास, २१ विद्यार्थ्यांनी जेईईचं मैदान मारलं

गोंदिया : महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात राज्य सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कमाल केली आहे. विद्यार्थी इथं प्रशिक्षण घेताना अभ्यास करत करत इंजिनिअर आणि डॉक्टर बननण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करतात. इथल्या प्रशिक्षण केंद्रात बारावीच्या परीक्षेनंतर २५ आदिवासी विद्यार्थ्यांना पुढचे ४५ दिवस प्रशिक्षण देत अभ्यास करुन घेण्यात आला. याचा असा फायदा झाला की बारावी परीक्षेनंतर २५ पैकी २१ विद्यार्थि जेईई अॅडव्हान्सड परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रशिक्षण केंद्र गोंदियाच्या बोरगाव बाजार येथे चालवलं जातं. इथं जिल्ह्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. २०२१ मध्ये राज्य सरकारनं प्रशिक्षण केंद्र सुरु केलं होतं. या उपक्रमाला शिखर हे नाव देण्यात आलं होतं. जेईई अॅडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचं स्वप्न आहे.

व्यावसायिक प्रशिक्षणाशिवाय यश मिळवलं

या प्रशिक्षण केंद्रातील १० विद्यार्थी सध्या नीट परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत. काही विद्यार्थ्यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासंदर्भातील परीक्षा दिल्या आहेत. आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी व्यावसायिक प्रशिक्षणाशिवाय हे यश मिळवलं आहे. आदिवासी विकास विभागाची एक टीम तिथं कार्यरत होती, असं देखील त्यांनी सांगितलं.
Nashik News: भरधाव बुलेट आली, तो रस्ता ओलांडत होता, ६ वर्षांच्या चिमुकल्यासोबत घरासमोरच अनर्थ घडला
आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास रचेलवार यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेतून निवडलं होतं. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी पूर्व विदर्भ आणि नक्षलग्रस्त भागातील होते. विद्यार्थ्यांनी यश मिळवल्यानं आता आम्हाला प्रकल्पाचा विस्तार करायचा आहे, असं विकास रचेलवार यांनी सांगितलं. आमच्या केंद्रात २५ विद्यार्थी तयारी करत होते, ती संख्या २०० वर न्यायची आहे, असं ते म्हणाले.
Novak Djokovic ने जिंकली मानाची फ्रेंच टेनिस स्पर्धा, कॅस्पर रुडला चारली धुळ
आम्ही त्यासाठी तयारी देखील केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना यासाठी निवडलं गेलं होतं , त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आश्रम शाळेतील होते किंवा केंद्राच्या एकलव्य शाळेतील होते.बोरगाव बाजारमध्ये चांगली व्यवस्था असल्यानं या गावाची निवड केली. यासाठीचा सगळा खर्च राज्य सरकार करते, असं ही ते म्हणाले.

वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नाही, आळंदीत काय घडलं? फडणवीसांनी एक एक करुन सगळं सांगितलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed