हिंदू धर्मीय मुलांना ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर होत असल्याची नोटीस उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी बजावली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहनवाज खान हा आपल्या कुटुंबीयांसोबत मुंब्रा येथील देवरी पाडा परिसरात रहाणार असल्याची माहिती गाजियाबाद पोलिसांना मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश एसटीएफचे पथक आरोपीच्या शोधासाठी मुंब्र्यात दाखल झाले.
या प्रकरणाच्या तपासात उत्तरप्रदेश पोलिसांनी गाजियाबाद येथून अब्दुल रहमान उर्फ नन्नी पुत्र महमूद अन्सारी या आरोपीला अटक केली. कुटुंबीयांची तक्रार गाझियाबाद येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, महाराष्ट्रातील मुंबईला लागून असलेल्या मुंब्रा भागात शाहनवाज मकसूद खान हा बनावट युजर आयडी बनवून त्याच्या माध्यमातून तो तो गेम खेळण्यासाठी उपलब्ध करून देत होता. या गेम मध्ये हरलेल्या हिंदू मुलांना तो कलमा वाचायला सांगून इस्लाम कबूल करण्यास भाग पडत होता. त्यांना कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार नसल्याचे अमिश दाखवत होता.
मुंब्रा येथील देवरी पाडा येथे असलेल्या शाझिया इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शाहनवाज मकसूद खान नावाचा व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहत होता. गाझियाबाद पोलीस शाहनवाज मकसूद खानच्या शोध घेत असून त्याला अटक करण्यासाठी काही दिवसांपासून मुंब्रा येथील देवरी पाडा येथे आले. मात्र शाहनवाज मकसूद खान हा आपल्या कुटुंबासह कुठेतरी फरार झाला आहे.
शाहनवाजच्या शेजारच्यांनी सांगितले की, त्याच्या घरात तीन भाऊ आणि आई असा परिवार आहे. शाहनवाजचा हर्बल शॅम्पू बनवण्याचा व्यवसाय आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांच्या घराला कुलूप आहे. मात्र अद्याप कुठलेही पोलीस आले नसल्याचे शेजाऱ्यांकडून सांगण्यात आले.
या बाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी गाजियाबाद येथून आलेले पथक हे आपल्या सोबत सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे सांगितले. गेल्या चार दिवसांपासून शाहनवाजचा शोध सुरु आहे. मात्र या प्रकरणी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.