• Sat. Sep 21st, 2024

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १६ जूनपासून पाणी महागणार, पाणीपट्टी इतकी वाढण्याची शक्यता

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १६ जूनपासून पाणी महागणार, पाणीपट्टी इतकी वाढण्याची शक्यता

Mumbai News : मुंबईकरांचं पाणी महागणार असंच काहीसं चित्र दिसून येत आहे. पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

water bill
६ जूनपासून पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : उन्हाचा तडाखा वाढत असून मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव तळ गाठत असतानाच महापालिका वार्षिक पाणीपट्टीत वाढ करण्याच्या तयारीत आहे. सन २०२३-२४ मध्ये मुंबईकरांच्या पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. दरवाढीचा हा प्रस्ताव पाणी विभागाने पालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्या मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. पालिकेने सन २०१२ मध्ये पाणीपट्टीत प्रत्येकवर्षी कमाल आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीने याबाबत प्रशासनाला अधिकार दिले आहेत. या धोरणाच्या आधारे पालिका प्रशासनाकडून दरवर्षी १६ जूनपासून पाणीपट्टीत वाढ केली जाते. आस्थापना खर्च, भातसा धरणाच्या पाणी पुरवठ्यासाठी राज्य सरकारला देण्यात येणारी रॉयल्टी तसेच धरण व इतर देखभाल खर्च, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, विद्युत खर्च या सर्वाची गोळाबेरीज करून पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार केला जातो.
मुंबईत रिडेव्हलमेंटच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; हजारो इमारतींबाबत मोठा निर्णय
करोनामुळे सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या मागील दोन वर्षांत पाणीपट्टी, मालमत्ता कर व अन्य करांमध्ये पालिकेने वाढ केली नव्हती. पाणीपुरवठ्यासाठी विद्युत खर्चासह अन्य पायाभूत खर्च येत असतात. त्यामुळे जलशुद्धीकरणाच्या खर्चात वाढ होत आहे, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जल विभागाने आयुक्तांना पाठवलेल्या प्रस्तावाला या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed