• Sat. Sep 21st, 2024

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी, तरुण आमदारांना संधी देत भाजप दुहेरी डाव टाकणार

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी, तरुण आमदारांना संधी देत भाजप दुहेरी डाव टाकणार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी मागणी शिंदे यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन १९ जून रोजी असतो, त्यामुळं विस्तार होणार का याकडे लक्ष लागलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना भाजपच्या महाराष्ट्रातील मिशन ४५ ला फायदेशीर ठरतील अशा नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत होते, अमित शाह यांची काल त्यांनी भेट घेतली. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. यावेळचा मंत्रिमंडळ विस्तार करताना भाजप मिशन ४५ डोळ्यासमोर ठेवणार आहे. लोकसभा निवडणुकीत फायदेशीर ठरतील अशा नेत्यांना मंत्री म्हणून संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
Vande Bharat : कोकणातील वंदे भारत एक्स्प्रेसबाबत आली मोठी अपडेट, ओडिशातील अपघातामुळे…

सध्याच्या मंत्रिमंडळात कार्यरत असणारे ज्येष्ठ नेते समाधानकारक कामगिरी करु न शकल्यानं त्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता असल्याची देखील माहिती समोर आली आहे. मंत्रिंमडळ विस्तार नेमका कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना नव्या आमदारांना देखील संधी दिली जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

‘सॉफ्ट सिग्नल’ नियम बंद, हेल्मेट घालणे…. WTC फायनलमध्ये पाहता येणार या नव्या गोष्टी

शिंदे गटाच्या खासदारांना केंद्रात २ मंत्रिपदं मिळणार?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे १३ खासदार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास शिंदे यांच्यासोबत असलेल्य खासदारांपैकी दोन नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. शिवसेना २०१९ पूर्वी एनडीएमध्ये होती तेव्हा त्यांच्याकडे एक कॅबिनेट मंत्रिपद होतं. मात्र, सध्या शिवसेना हाच एनडीएमधील भाजप नंतरचा सर्वात मोठी मित्र पक्ष आहे. त्यामुळं आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात दोन मंत्रिपदं शिंदे समर्थक खासदारांना मिळणार का हे पाहावं लागेल. एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या खासदारांपैकी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा यापूर्वी झाली होती.

Odisha Accident: कोरोमंडल, हावडा एक्स्प्रेसमधून विनातिकीट प्रवास, रेल्वे अपघातात मृत्युमुखी, नुकसान भरपाई मिळणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed