• Sat. Sep 21st, 2024

पावसापासून बचावासाठी स्टेजखाली जाऊन बसले, लोखंडी रेलिंग मातीत खचलं अन्

पावसापासून बचावासाठी स्टेजखाली जाऊन बसले, लोखंडी रेलिंग मातीत खचलं अन्

पुणे: लोणी काळभोर हद्दीतील रामदऱ्या जवळ आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान स्टेज कोसळला. या घटनेत एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना आज म्हणजेच ४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

बाळासाहेब काशिनाथ कोळी (वय ४६, राहणार निनाम पाडळी सातारा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शुभम विजय लोखंडे (वय-२४, धंदा नोकरी राहणार संगमनेर तालुका भोर जिल्हा पुणे), मयूर प्रमोद लोखंडे (वय-२५ धंदा शेती) आणि विकास वाल्मीक ढमाळे (वय-२४ राहणार पिंपरी वळण तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर) अशी जखमी झालेल्या तीन जणांची नावे आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Newly Married Couple: मधुचंद्राच्या रात्री बेडवरच कपलचा मृत्यू, कसा कुणाला कळेना? अखेर गूढ उकललं…
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वडकी गाव येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहू लागल्याने शर्यत बघायला आलेल्या लोकांची धांदल उडाली.

अमरावतीत बैलगाडा शर्यतीचं आयोजन, बच्चू कडूंच्या हाती बैलजोडीची धुरा

दरम्यान, पावसापासून बचाव करण्यासाठी हे चौघे जण स्टेजखाली जाऊन बसले होते. मात्र, पावसामुळे स्टेजच्या लोखंडी पायऱ्यांचे रेलिंग मातीत खचले आणि ते एका बाजूला पडले. स्टेज कोसळल्याने सदर चौघे गंभीर जखमी झाले. त्या जखमींना तातडीने सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील बाळासाहेब कोळी यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती मिळत आहे. सध्या स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतं आहेत.

नको जाऊ गं… बापाने पाया पडल्या, विनवण्या केल्या, पण त्या निष्ठुर पोरीने काही ऐकलं नाही, अन्… पाहा VIDEO

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed