पंकजा मुंडेंनी काय सांगितलं?
“मुंडे साहेबांच्या दहाव्याच्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा होती. आम्ही घरात चोरासारख्या वावरत होतं. आम्हाला वाटत होतं की, आमच्या आईला कळलं तर काय होईल? कारण तिने आयुष्यभर व्रतवैकल्य केली. माझ्या नवऱ्याआधी माझा मृत्यू होऊ दे,असं प्रत्येकाला असंच वाटतं, मलाही असंच वाटतं, पण तिला तसं भोगता आलं नाही” असं पंकजा मुंडे सांगत होत्या.
“आम्ही चोरासारखे वावरत होतो. दहाव्या दिवशी मी नैवेद्य दाखवण्यासाठी इथे (गोपीनाथ गडावर) आले होते. मुंडे साहेबांच्या चितेला जिथे अग्नी दिला, तिथे सवाष्णींनी पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला होता, आंबे आणून ठेवले होते. मला कमाल वाटली” अशी हृदयस्पर्शी आठवण पंकजा मुंडे यांनी आपले पिता- दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीत सांगितली.
“त्या सगळ्यांच्या प्रेमामुळे हा गोपीनाथगड निर्माण झाला. मी एक रुपयाचीही मदत घेतलेली नाही. कोणाकडूनच नाही. आयुष्यात मला निवडणुकीचं अपयश कधीच जिव्हारी लागलं नाही. मला एकच अपयश आयुष्यात जिव्हारी लागलं, आता त्यात माझा किती दोष आहे हे काळ ठरवेलच. पण वैद्यनाथ कारखान्याला पूर्ववत जीवन प्राप्त करुन द्यावं हे माझं स्वप्न आहे” अशी इच्छा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
“माझी खुर्ची, माझं पद, माझी प्रतिष्ठा, मला हे कधीच जमलं नाही. मी थकणार नाही, झुकणार नाही, मी थांबणार नाही हे मी म्हणत असते, ते म्हणजे माझ्या लोकांना आधार देण्याकरिता” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.