• Sat. Sep 21st, 2024
खतरनाक! महिला शिक्षण अधिकारी लाच घेताना रंगेहाथ, घरात सापडली ८५ लाखांची रोकड, ३२ तोळं सोनं

नाशिक : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली. नाशिक महापालिका शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या कारवाईनंतर एसीबीने त्यांच्या घरातील झाडाझडती घेतली असता तब्बल ८५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि ३२ तोळे सोनं मिळाले, तर एनसीबीला काही मालमत्तांची कागदपत्रे देखील सापडली आहेत.

एवढी रक्कम पाहून खुद्द एसीबीचे अधिकारी देखील बुचकळ्यात पडले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत केलेल्या कारवायांमध्ये ही सर्वात जास्त रक्कम आढळून आल्याचे एसीबी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

काल महापालिका शिक्षण विभाग अधिकारी सुनीता धनगर आणि शिक्षण विभागाचा लिपिक नितीन जोशी यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ अटक केली होती. सस्पेंड मुख्याध्यापकास कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी महापालिका शिक्षण विभागातील अधिकारी सुनीता धनगर आणि लिपिक नितीन जोशी यांनी ५० हजारांची लाच मागितली होती.

लग्नानंतर २० दिवसात बायकोचं अफेअर समजलं; ना खूनखराबा ना शोरशराबा, नवऱ्याचा मोठा निर्णय
तक्रारदार हे मुख्याध्यापक असून त्यांना एका प्रकरणात निलंबित करण्यात आलेले होते, कामावर रुजू करून घेण्यासाठी लिपिक जोशी यांनी पाच हजार, तर धनगर ४५ हजार रुपये घेत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले, त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता मोठे घबाड पथकाच्या हाती लागले आहे.

समीर वानखेडेंनी आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी मागितल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे

सुनिता धनगर यांच्या नावावर दोन फ्लॅट आणि एक प्लॉट असल्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माहिती दिली आहे. प्लॉट आडगाव येथे, एक फ्लॅट टिळकवाडी, तर दुसरा फ्लॅट उंटवाडी येथे असल्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढेंची महिन्याभरातच पुन्हा बदली, वीस IAS अधिकाऱ्यांची ट्रान्सफर
पालिका शिक्षण अधिकारी असूनही त्यांनी एवढे घबाड जमा केल्याने पथकही अचंबित झाले आहेत. सुनिता धनगर यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed