विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली असून त्यावर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे विलास लांडे देखील खासदारकीची लढवण्याची तयारी करतात की काय अशा चर्चांना आता उधाण आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतच लोकसभेच्या जागेवरून वाद होण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे.
दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरु केली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राष्ट्रवादीतच या जागेसाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजीला उत् आला आहे. मात्र यामुळे राष्ट्रवादीचं अंतर्गत स्पर्धा सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या पोस्टरमधून त्यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.
शरद पवार यांनी नुकतेच लोकसभेसाठी दोन नेते त्यांच्या मनात असल्याचे सांगितले होते त्यात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे ही दोन नावे असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, विलास लांडे यांनी या जागेवर दावा ठोकल्याचे बोलले जात आहे. त्यामुळं या जागेवरून राष्ट्रवादीत अंतर्गत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर नवे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही जागा कोणाला मिळणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.