• Mon. Nov 25th, 2024

    ‘मॉइल’ची सव्वा कोटींनी फसवणूक; मुख्य वित्त व्यवस्थापकाकडे सीबीआयचे छापे

    ‘मॉइल’ची सव्वा कोटींनी फसवणूक; मुख्य वित्त व्यवस्थापकाकडे सीबीआयचे छापे

    Nagpur News : मॉइलची सव्वा कोटींनी फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. मुख्य वित्त व्यवस्थापकाकडे सीबीआयने छापे टाकले.

     

    ‘मॉइल’ची सव्वा कोटींनी फसवणूक
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : कंपनी स्थापन करून मॉईलची सव्वा कोटींपेक्षा अधिकची फसवणूक केल्याप्रकरणात सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्य वित्त व्यवस्थापक सचिन अरुण गजलेवार रा. दीक्षितनगर, नारी रोड यांच्या निवासस्थानी व कार्यालयात बुधवारी छापे टाकले. सीबीआयच्या या कारवाईने मॉईलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.या फसवणूक प्रकरणात सचिन यांच्यासह धरमपेठेतील भगवाघर ले-आऊट येथील मेसर्स इझिकॉम सोल्युशन, जरीपटक्यातील बेझनबाग येथील मेसर्स इकोटेक सर्व्हिसेस व अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली. या दोन्ही कंपन्या सचिन यांच्या पत्नी नीलिमा यांच्या नावे आहेत.
    CBI च्या जाळ्यात टपाल खात्याचा अधिकारी, ६० लाखांची हेराफेरी; वाचून पायाखालची जमिन सरकेल
    या कंपनीद्वारे सचिन यांनी मॉईलची एक कोटी ३५ लाखांनी फसवणूक केली. दक्षता पथकाने सचिन यांनी फसवणूक केल्याची तक्रार संबंधित मंत्रालयाला १४ नोव्हेंबर २०२२ला केली. त्यानंतर दक्षता विभागाने या गैरव्यवहाराची चौकशी केली. चौकशीदरम्यान सचिन यांनी कंपन्यांच्या माध्यमातून स्वत: व नातेवाइकांच्या खात्यात कोट्यवधी रुपये वळते केल्याचे समोर आले. या कंपनीच्या नावावर एक कोटीपेक्षा अधिकचे कर्ज घेतले. मात्र कर्जाची कंपनीच्या व्यवहारात नोंद केली नाही. हे सर्व व्यवहार नोव्हेंबर २०१९ ते जानेवारी २०२२ या काळात झाले.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *