• Sat. Sep 21st, 2024

सोलापुरात कार घेऊन जाणाऱ्या मालगाडीचा डबा घसरला; रेल्वे वाहतुकीचा अडीच तास खोळंबा

सोलापुरात कार घेऊन जाणाऱ्या मालगाडीचा डबा घसरला; रेल्वे वाहतुकीचा अडीच तास खोळंबा

सोलापूर: सोलापूर जवळ असलेल्या पाकणी येथे दौंडकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी मालगाडी मुंढेवाडी ते पाकणीदरम्यान पाकणी रेल्वे स्टेशनच्या जवळ रुळावरून सांयकाळी पावणेपाचच्या सुमारास घसरली आहे. ही मालगाडी लुपलाईनवर असल्याकारणाने मालगाडीचा वेग कमी होता. रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मालगाडीचा एक डबा रुळावरून घसरला आहे. डाऊन साईडचे चार ते पाच डबे मेन लाइनवर असल्यामुळे रेल्वे वाहतूक दोन ते अडीच तास खोळंबली होती. पण रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवासी रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती दिली.रुळावरून डबा घसरल्याने अधिकाऱ्यांची धावपळ

पाकणी रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाल्याची माहिती कळताच रेल्वेचे आरपीएफ ऑफिसर सतीश विधाते फौज फाट्यासह दाखल झाले होते. या अपघातात कोणतीही जीविहानी झाली नाही.

लग्नाला आलेल्या संतोष बांगर यांच्यासमोर ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा, खासदार संजय जाधव यांना केला चरणस्पर्श
रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी डीआरएम निरजकुमार धोरे, अधिकारी आलोरे, पी. डब्ल्यू. मुळे हे ठाण मांडून होते. रेल्वेचे रेस्क्यू टिमने मुंढेवाडीकडील मेन लाइनवरचे मालगाडीचे डबे, रेल्वे इंजन मुंढेवाडीस्थानकाकडे घेऊन जाऊन सांयकाळीे ७.२५ ला मेन लाइन मोकळी केली. हा अपघात बघण्यासाठी यावेळी पाकणी आणि परिसरातील बघ्याची गर्दी झाली होती.

ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले; भीषण अपघातात मायलेकीचा मृत्यू, वडिलांसह दुसरी मुलगी जखमी, मेहकरमधील घटना
अहमदाबाद ते बंगळुरूकडे कार घेऊन निघाली होती मालगाडी

रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना माहिती दिली,ही मालगाडी कार घेऊन अहमदाबाद ते बंगळुरूकडे जात होती.मंगळवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास एक डबा रुळावरून घसरला. मालगाडीचा वेग कमी असल्याने एकच डबा रुळावरून खाली उतरला. यामध्ये कोणतीही जीविहानी झाली नाही. वित्तहानीबाबत रेल्वे अधिकारी एक समिती नेमून अपघाताचे नेमके कारण व एकूण नुकसान किती झाला याबाबतची माहिती घेणार आहेत.
IPL फायनलवर सुरू होता सट्टा, पोलिसांना मिळाली गुप्त माहिती, गोव्याहून आलेले बुकी नागपुरात अकडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed