परभणी : शिंदे गटाचे नेते जिथे कुठे जात आहेत तेथे ‘एकदम ओके’ अशी घोषणाबाजी त्यांची काही केल्या पाठ सोडत नाही. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे एका लग्न समारंभाला आले असता त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांचे चरणस्पर्श केले. त्यानंतर ‘५० खोके, एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीमुळे लग्न समारंभाला उपस्थित असलेल्या सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक खासदार आणि आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गुहाटी येथे गेले. त्यानंतर या आमदारांनी पन्नास खोके घेतले असल्याचा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जात आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे एका लग्न समारंभाला आले असता त्यांच्यासमोर ‘५० खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.
विशेष बाब म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव हे त्या लग्न समारंभाला उपस्थित होते. आमदार संतोष बांगर यांना ते दिसल्यानंतर त्यांनी त्यांचे चरण स्पर्श केले. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

मागील काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खासदार आणि आमदारांना अशा घोषणाबाजीचा सामना करावा लागत आहे. परभणी हा मागील तीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे आता या ठिकाणी शिंदे गटाचे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.