• Sat. Sep 21st, 2024

पतीसोबत वाद झाल्याने मैत्रिणीकडे गेली; मैत्रिणीने असाह्यपणाचा फायदा घेत केलं भयंकर कृत्य

पतीसोबत वाद झाल्याने मैत्रिणीकडे गेली; मैत्रिणीने असाह्यपणाचा फायदा घेत केलं भयंकर कृत्य

छत्रपती संभाजीनगर: पतीसोबत वाद झाल्याने रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या २५ वर्षीय विवाहितेने मैत्रिणीचं घर गाठलं.आश्रय घेण्यासाठी आलेल्या विवाहितेचा बळजबरीने वृद्धाशी विवाह लावून देण्यासाठी दोन दिवस डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रिस्क्रिप्शनविना गर्भपात गोळ्यांची विक्री करणं पडलं महागात; विक्रेत्यासह पुरवठादारालाही अटक
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली (नाव बदलले आहे) ही पती व सासू सोबत वाळूज महानगर परिसरामध्ये राहते. दरम्यान, 22 मे रोजी सोनाली हिचा पतीशी वाद झाला यामुळे रागाच्या भरात सोनाली घर सोडून गेली. तिने जोगेश्वरी येथे राहणाऱ्या मुस्कान शेख नावाच्या मैत्रिणीचे घर गाठलं. या ठिकाणी तिने मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मैत्रीण मुस्कान सोनालीला म्हणाली तुझा नवरा आता तुला घरात घेणार नाही, आपण घरीच राहिलो तर बोर होऊ असे म्हणत, चितेगाव येथे राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी सोनालीला रिक्षाने घेऊन गेली.

सिग्नल तोडणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून भर चौकात मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद

चितेगाव येथे गेल्यानंतर मुस्कान सोनालीला एका खोलीत घेऊन गेली. दरम्यान, काही वेळाने मुस्कानची आई मुन्नी शेख व तिचा मित्र शाहरुख सय्यद खोलीवर आले. सोनालीला घरातील संपूर्ण वातावरण बघून काहीतरी विचित्र होत असल्याचे लक्षात आलं. यावेळी तिने मला या ठिकाणी राहायचं नाही मला घरी नेऊन सोडा अशी मागणी तिघांकडे केली.यावर या तिघांनी तुला आता इथेच राहायचं आहे आम्ही तुला पतीकडे सोडणार नाही. आम्ही तुझं लग्न शाम नरवडे नावाच्या व्यक्तीसोबत लावून देणार आहे. तो तुला सुखात नांदवेल असे सांगत मुस्कान, मुन्नी आणि शाहरुख या तिघांनी मिळून सोनालीला दोन दिवस खोलीत डांबून ठेवलं.

त्यानंतर हे तिघेजण सोनालीला बीड बायपास परिसरात असलेल्या एका दोन मजली इमारती घेऊन गेले. त्या ठिकाणी असलेल्या वयस्कर व्यक्तीसोबत तुला लग्न करावे लागेल याशिवाय तुला पर्याय नाही असं धमकावले. सोनाली लग्न करण्यास तयार नसल्यामुळे त्या वयस्कर व्यक्तीने ही मुलगी लग्नासाठी तयार नसेल तर दुसरी मुलगी लग्नासाठी घेऊन या असे या तिघांना सांगितलं. दरम्यान, सोनाली लग्नाला तयार होत नसल्यामुळे मुस्कान मुन्नी आणि शाहरुख या तिघांनी तिला चितेगाव येथे घेऊन जात मारहाण केली. त्यानंतर तिघेही घरातून बाहेर पडले यावेळी संधी साधत सोनालीने शेजारी असलेल्या महिलेकडून आपल्या घरी जाण्यासाठी ३० रुपये घेतले.
गोवंश वाहतुकीच्या संशयातून ट्रकचा पाठलाग, २० जणांचा तलवार हल्ला, भाजप कार्यकर्त्याचा दावा
सोनाली आपल्या तावडीतून निसटल्याचे तिघांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा पाठलाग सुरू केला. तिला रस्त्यात आडवत मारहाण करत रिक्षात बसून घाणेगावला घेऊन आले. दरम्यान, काही वेळाने सोनालीने त्या तिघांचे लक्ष चुकवत एका व्यक्तीच्या फोनवरून पतीला संपर्क करून घटनाक्रम सांगितला. यानंतर पतीने सोनालीची तिघांच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed