• Sun. Sep 20th, 2026

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली

ByMH LIVE NEWS

May 30, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ३०: ‘तळागाळापर्यंत पोहचलेले उमदे, लढवय्ये नेतृत्व अकाली गमावले आहे, अशा शोकपूर्ण भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, पूर्वीचा एक सच्चा शिवसैनिक ते आमदार आणि खासदार म्हणून बाळू धानोरकर यांची वाटचाल जवळून पाहिली आहे. मतदार संघातील विकास कामांसाठी त्यांचा सातत्यपूर्ण असा पाठपुरावा आणि धडपड असायची. नुकतेच त्यांचे पितृछत्र हरपले होते. त्यानंतर त्यांचे असे अकाली निधन त्यांच्या कुटुंबीयांसह, कार्यकत्यांकरिता एक आघात आहे. धानोरकर कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. खासदार बाळू धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed