• Sat. Sep 21st, 2024
पुण्याहून सुट्टीसाठी गावी आली पण वाटेतच नियतीची वक्रदृष्टी, अपघातात बापलेक जागेवर गेले

सांगली : दुचाकीवरून निघालेल्या एका बाप-लेकीचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घरगुती कामानिमित्ताने निघाले असता शिराळा तालुक्यातल्या बिऊर या ठिकाणी चार चाकी गाडीची आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये इस्लामपूरचे आत्माराम पवार व त्यांची मुलगी तृप्ती पवार जागीच ठार झाले आहेत.उरूण इस्लामपूर या ठिकाणी राहणारे आत्माराम पवार (वय ६०) आणि त्यांची मुलगी तृप्ती पवार (वय २६) या बापलेकीचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला. आत्माराम पवार हे आपली मुलगी तृप्ती पवार हिला घेऊन दुचाकीवरून एका घरगुती कामानिमित्ताने शिराळा तालुक्यातल्या कोकरूड या ठिकाणी निघाले होते. घरातून बाप-लेक निघाल्यावर शिराळा तालुक्यातल्या बिऊर येथे पोहोचले असता काळाने त्यांच्यावर घाला घातला.

भाकरी फिरविण्याची सुरुवात शेजाऱ्यापासून, दादांनी माजी आमदारालाच सांगितलं तिकीट मिळणार नाही!
कोकरुडकडून येणारी एक भरधाव चार चाकी गाडी आणि पवार यांची दुचाकीची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दुचाकीचा चक्काचूर झाला तर दुचाकीवर असणारे आत्माराम पवार आणि तृप्ती पवार हे दोघेही उडून खाली पडले. ज्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तृप्ती पवार हिच्या जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असणाऱ्या आत्माराम पवार यांना उपचारासाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून कराड इथल्या खाजगी रुग्णालयामध्ये घेऊन जात असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

शिकण्याच्या वयात गुन्हेगारीत एन्ट्री, पोलिसांनी कीटक गँगचा माज उतरवला, जिथे गुन्हा केला तिथूनच धिंड!
सोलापूर जिल्ह्यात राहणारे अल्पेश खडतरे हे रत्नागिरीहून शिराळा मार्गे सोलापूरला निघाले होते. यावेळी भिवर जवळ ते आले असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटला, ज्यामुळे समोरून येणाऱ्या पवार यांची दुचाकी व खडतरे यांच्या चारचाकी मध्ये जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे.

बापाकडून पैसे उसने, मग जमीन नावावर करण्यासाठी तगादा, वाद वाढताच लेकाने वाद संपवला!

बाप लेकीच्या या मृत्यूच्या घटनेमुळे उरून इस्लामपूर परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तृप्ती पवार ही ई अँड टीसी इंजिनियर होती. सध्या ती पुण्यातील एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीस होती. काही दिवसांपूर्वीच तृप्ती ही इस्लामपूर या ठिकाणी आपल्या आई-वडिलांच्याकडे सुट्टीसाठी आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed