• Mon. Nov 25th, 2024

    स्पोर्ट्स बाईकवरुन भरधाव निघाले, वाटेत अनर्थ घडला अन् तीन मित्रांनी एकत्र जग सोडलं…

    स्पोर्ट्स बाईकवरुन भरधाव निघाले, वाटेत अनर्थ घडला अन् तीन मित्रांनी एकत्र जग सोडलं…

    रायगड: कोकणातील रायगड जिल्ह्यात वाकण पाली मार्गावर एका स्पोर्ट्स बाईकचा भीषण अपघात झाला आहे. नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवार पहाटे तीन ते चारच्या दरम्यान हा मोठा अपघात झाला आहे. महागड्या स्पोर्ट बाईकवर बसून पहाटेच्या सुमारास ३ मित्र ट्रिपल सीट निघाले होते. या भीषण अपघातात या तीनही मित्रांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाकण-पाली राज्य मार्गावर वजरोली गावच्या हद्दीत झालेल्या या अपघातात जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.स्पोर्ट्स बाईकवरील नियंत्रण सुटल्याने बाइकने लोखंडी संरक्षण कठड्याला जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीरच्या जखमी झालेल्या एका तरुणाचा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला. सुधागड पाली तालुक्यात भालगुल या गावात लग्नसोहळा आटपून ते निघाले होते.

    Delhi Murder: मानेवर ६, पोटावर १० जखमा, दगडाने डोकं फाटलं; साक्षीच्या शवविच्छेदन अहवालात काय-काय?
    ओमकार मोरेश्वर देशमुख (वय २० रा. भालगुल – सुधागड), ऋषिकेश निळकंठ लोखंडे (वय २४ रा. कल्याण) आणि यश जयेश चव्हाण (वय २१ रा. बोईसर पालघर) अशी तिघांची नावं आहेत. हे तिघे मित्र त्यांच्याकडील हीरो एक्स पल्स – २०० या स्पोर्ट्स बाईकने अतिवेगात आणि ट्रिपल सीट प्रवास करीत होते. त्यांची बाइक वाकणजवळील वजरोली गावाच्या हद्दीत एका वळणावर आली असता बाईक चालकाचे नियंत्रण सुटले. बाईक रस्त्यावरून घसरुन कडेला असलेल्या लोखंडी संरक्षण कठड्याला जोरदार धडकली. यावेळी दोघेजण रस्त्यावर आणि एक जण संरक्षण कठड्याच्या पलीकडे जाऊन पडला.

    हा अपघात इतका भीषण होता की, तिघांच्याही डोक्याला, हातापायाला गंभीर दुखापत झाली. यामध्ये ओमकार देशमुख आणि ऋषिकेश लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर जय चव्हाण याला उपचारासाठी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात असताना वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हे तीन मित्र असा धोकादायक प्रवास का करत होते, कोणत्या ठिकाणी ते जात होते याची माहिती उपलब्ध झाली नसली तरी या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतेय.

    डंपरची धडक, आमदार लता सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या गाडीला अपघात!

    या अपघाताचे वृत्त कळताच रोहा येथील पोलीस अधिकारी सोनाली कदम, नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमण यांच्या पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या सगळ्या भीषण अपघाताची नोंद रायगड येथील नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास नागोठणे पोलिस करत आहेत. अपघात प्रकरणी अधिक तपास नागोठणे पोलिस ठाण्याचे संदीप पुनम करत आहेत.

    दिल्ली पुन्हा हादरली! त्याने चाकू काढला अन् थेट डोक्यात २१ वार, मग दगड उचलला… साक्षी मर्डर केसची Inside Story

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed