नाशिक : नाशिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. चोरांची नजर आता देवाच्या मंदिराकडे वळली आहे. शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या गणेशवाडी येथील देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. देवीच्या मंदिरात असलेल्या पितळीच्या भरीव पादुका चोरीला गेल्या आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पंचवटी परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मंदिरात घुसून भरीव पितळाच्या पादुकांची चोरी करण्यात आली आहे.दरम्यान ही चोरीची घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक अज्ञात चोरटा देवीच्या मंदिरात जाऊन लोखंडी ग्रीलमधून हात टाकून पादुका घेऊन जाताना दिसत आहे. गणेश वाडी परिसरातील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात पहाटेच्या सुमारास दर्शनाला भाविक आल्यानंतर त्या ठिकाणी पादुका नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर मंदिरातील पादुका चोरी झाल्याचे समजले.
मरणोत्तर अवयवदानाचा फॉर्म भरला, कार्ड घरी आलं, चारच दिवसात Organ Donation ची दुर्दैवी वेळ
त्याचबरोबर तेथील काही अन्य साहित्यदेखील चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस तपास करीत आहेत. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून पळणे, घरफोडी करणे अशा घटना घडत असताना मंदिरातदेखील चोरी होऊ लागल्या आहेत.दाक्षायणी देवी मंदिरातून चोरट्यांनी थेट दानपेटीच उचलून नेली; गावकऱ्यांना धक्का
मागच्या काही दिवसांपूर्वी देखील नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात असलेल्या चांदीच्या गणपती मंदिरात चोरी झाली होती. तिथे पहाटेच्या सुमारास सुरक्षारक्षकावर हल्ला चढवत देवाच्या मूर्तीवरील दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा नाशिकच्या पंचवटीतील देवी मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
झोक्यातून बाळ पडू नये, आईने काळजीपोटी बांधला रुमाल; फास बसून चिमुकल्याचा करुण अंत