• Sat. Sep 21st, 2024

पुन्हा उत्पन्नाचा दाखला कशासाठी मागता? जाचक अट रद्द करण्याची OBC अधिकारी-कर्मचारी संघाची मागणी

पुन्हा उत्पन्नाचा दाखला कशासाठी मागता? जाचक अट रद्द करण्याची OBC अधिकारी-कर्मचारी संघाची मागणी

Nagpur News : उत्पन्नाचा दाखल्याच्या जाचक अट रद्द करण्याची OBC अधिकारी-कर्मचारी संघाकडून मागणी करण्यात आली आहे.

 

fake document.
पुन्हा उत्पन्नाचा दाखला कशासाठी मागता?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : इतर मागासवर्गीय, भटके जाती व जमाती आणि विशेष मागास प्रवर्गांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलेअरची अट आहे. ते काढताना उत्पन्नाचा दाखला सादर करावाच लागतो. असे असताना योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा उत्पन्नाचा दाखला का मागता, असा सवाल करत ही अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी अधिकारी-कर्मचारी संघाकडून करण्यात आली.मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील व्यक्तींकरिता शासकीय नोकरी, उच्चशिक्षण व विविध शासनाच्या योजनांमध्ये सवलत मिळवायची असेल तर १६ नोव्हेंबर १९९२च्या सर्वोच्च न्यायालयातील इंदिरा सहानी खटल्याच्या निर्णयाचा आधार घेतला जातो. जे व्यक्ती उन्नत व प्रगत गटात मोडत नाहीत, त्यासाठी कुटुंबाची वार्षिक मर्यादा एक लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. अशा व्यक्तींच्या पाल्यांनाच ओबीसी प्रवर्गाचे लाभार्थी ठरविण्यात आले आहे. यानुसार महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून ही मर्यादा निश्चित केली होती. केंद्र शासनाच्या डीओपीटी विभागाच्या आदेशातील सूचनांनुसार दर तीन वर्षांनी रुपयांचे मूल्य विचारात घेऊन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढविण्याची तरतूद आहे. यानुसार सध्या नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये आहे.
मोफत धान्यासाठी येतात कारने! अभियंता, कंत्राटदारही लाभार्थी? नागपुरातील धक्कादायक वास्तव उघड
उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेल्यांना कोणत्याही योजनांसाठी अर्ज करायचा असल्यास नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासह उत्पन्नाचा दाखला मागितला जातो. त्यामुळे या योजनांचा लाभ घेण्यात पात्र लाभार्थ्यांनाही अडचणी येत आहेत. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी उत्पन्नाचा दाखला दिला जातो. असे असताना योजनांच्या लाभाकरिता आवश्यक अटी व शर्तीत नव्याने उत्पन्नाचा दाखला ही अट जोडलेली असते. हा मोठा विरोधाभास असल्याचे मत ओबीसी अधिकारी-कर्मचारी संघाचे महासचिव राम वाडीभस्मे यांनी व्यक्त केले. त्यामुळे मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्यांना शैक्षणिक व इतर योजनांचा लाभ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्याच आधारावर देण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed