• Sat. Sep 21st, 2024
संभाजीराजेंसोबत बंद दाराआड चर्चा, लोकसभा उमेदवारीबाबत गिरीश महाजन स्पष्टच बोलले…

जळगाव : स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज जळगावात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. दोघांमधील भेट आणि बंद दाराआड चर्चा यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.महाविकास आघाडीमध्ये असो की भाजप शिंदे गटाच्या महायुतीमध्ये असो गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाचा मुद्द्यावरून राज्यात राजकारणात तापलं आहे. दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या स्वराज्य पक्षाच्या वतीने आगामी काळात निवडणुका स्वबळावर लढविण्याची नुकतीच घोषणा केली आहे. या सर्व विषयावरून आगामी काळातील निवडणुकांवरून राज्यातलं वातावरण तापलं आहे.

राष्ट्रवादीतून बडतर्फ झालेल्या संजय पवारही यांची उपस्थिती चर्चेत

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती हे आज एका कार्यक्रमासाठी जळगावात आले होते. या दरम्यान जळगावातील अजिंठा विश्रामगृहात मंत्री गिरीश महाजन यांनी संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली. तसंच मंत्री गिरीश महाजन यांनी संभाजीराजे छत्रपती यांचं स्वागत केलं. यादरम्यान गिरीश महाजन आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचीही उपस्थिती होती. विशेष म्हणजे यावेळी संजय पवारही उपस्थित होते. बाजार समिती आणि इतर निवडणुकांमध्ये भाजप, शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर बडतर्फिची कारवाई केली आहे. यावेळी संजय पवार यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

राज्यात भाविकांसाठी सर्वप्रथम या मंदिरात लावला ड्रेस कोडचा बोर्ड; फॅशन करायची असेल तर…
कुठलीही राजकीय चर्चा नाही – महाजन

संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात आगामी काळातील निवडणुकांबाबत संवाद झाला, अशी चर्चा होती. गिरीश महाजन यांनी अशी चर्चा फेटाळून लावली. ही चर्चा राज्यभिषेक सोहळा आयोजनाच्या विषयावर होती. संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत मित्रत्वाचे आणि कौटुंबीक संबंध आहेत. त्यांच्यासोबत राजकारणावर कुठलीही चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं.
गौतमी पाटीलला आडनावावरून धमकी, मराठा समाजाचे पदाधिकारी संतापले, शिवबा संघटनेला सुनावले
संभाजीराजे छत्रपती यांनी आगामी काळात स्वराज्य पक्षाच्या वतीने स्वबळावर निवडणुका लढविण्याची घोषणा केली, यावर मंत्री गिरीश महाजन यांना विचारण्यात आलं. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, राजकारणावर कुठलीही चर्चा त्यांच्यासोबत झालेली नाही, असं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.

गिरीश महाजन यांची जळगावातून लोकसभेसाठी तयारी, चर्चा रंगल्या

गिरीश महाजन यांना भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ह्या सर्व खोट्या गोष्टी आहेत. मीही टीव्हीवरच बघतोय. माझं नाव खासदार म्हणून सुचवलं जातंय. असा कुठलाही विषय आणि चर्चा निर्णय भाजपच्या बैठकीत झालेली नाही किंवा समोर आलेली नाही, हे सर्व कपोलकल्पित आहे. माझ्या खासदारकीच्या किंवा लोकसभेच्या उमेदवारीबाबत कुठलाही विषय आजपर्यंत झालेला नाही, असं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed