आरोपी रमेश मलप्पा गणपट्टी यांच्यावर कलम २६९,२७०,२७२ अंतर्गत कारवाई केली असल्याचे ठिळकनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग पीठे यांच्याकडून सांगण्यात आले. याबाबत महेश पाटील यांनी सांगितले की, बऱ्याच दिवसापासून दुधामधील पिशवीत भेसळ करण्याचे काम चालू होते. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी येथील नागरिकांना कडून माहिती मिळाली. असाच प्रकार चालू म्हणून रविवारी पहाटे सकाळी ५ वाजता सुरु होता.
मी स्वतः तिथे जाऊन तपासणी केली असता त्याठिकाणी मेणबत्ती ठेऊन, दुधाच्या पिशव्या फाडून त्यात पाण्याची भेसळ करण्याचा प्रकार चालू होता. जिमखाना रोडवरील मोहन प्लाझा या बिल्डिंगमध्ये हा सर्व प्रकार चालू होता. यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली असून पोलीस सर्वांना अटक करून घेऊन गेले आहेत. परंतु दूध हे आरोग्यासाठी चांगली वस्तू म्हणून लहान मुलांना आपण देत असतो परंतु अशा भेसळयुक्त दुधामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे. म्हणून मी स्वतः सरकारकडे मागणी करतो की दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांन विरोधात कठोरात कठोर शासन करावं आणि कठोर कायदा आणावा, अशी मागणी माजी नगरसेवक महेश पाटील यांनी केली.