• Sat. Sep 21st, 2024

नागपूर पुन्हा चर्चेत; कारागृहात मोबाइल व गांजा आढळला, दोन बंदीवानांविरुद्ध गुन्हा

नागपूर पुन्हा चर्चेत; कारागृहात मोबाइल व गांजा आढळला, दोन बंदीवानांविरुद्ध गुन्हा

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मध्यवर्ती कारागृहात मोबाइल व गांजा आढळण्याचे प्रकार थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी दुपारी कारागृहातील छोटी गोल परिसरातील रुग्णालयाजवळ पुन्हा मोबाइल व गांजा आढळून आला. त्यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. याप्रकरणात दोन शिक्षाधीन बंदीवानांविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडलं?

मोहम्मद सानू ऊर्फ मुस्तफा जमील खान पठाण (रा. मोमिनपुरा) आणि अमित प्रमोद सोमकुंवर (रा. कौशल्यानगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कारागृह रक्षक अमोल रामदास येवतकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी दुपारी रुग्णालय परिसरात अमोल हे गस्त घालत होते. यादरम्यान रुग्णालय परिसरातून जाताना सानूच्या हातात लाल रंगाची पिशवी असल्याचे अमोल यांना दिसले. त्यांना संशय आला. अमोल यांनी आवाज देताच सोनूने पिशवी फेकली. अमोल यांनी विचारणा केली. ‘सोमकुवरने पिशवी दिली. तुम्हाला बघून तो पळाला’, असे सानूने सांगितले. अमोल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यामध्ये चार मोबाइल, सहा बॅटरी, दोन सिमकार्ड व चार्जर आढळले. तसेच छोटी गोलजवळ अन्य एका पिशवीत ३४६ ग्रॅम गांजाही आढळून आला.

लग्नाचं वचन देऊन नेपाळमधील मुलीला आणलं पुण्यात; खोलीत डांबून ठेवले अन् रोज…, भयंकर घटना
रक्षक रडारवर, वॉच टॉवरवरून फेकली पिशवी

मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षारक्षक या प्रकरणात धंतोली पोलिसांच्या रडारवर आहे. हा रक्षक काही दिवसांपूर्वीच कारागृहात तैनात झाला. पोलिसांचा त्याच्यावर संशय असून, लवकरच त्याची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. ही पिशवी वॉच टावरवरून फेकण्यात आल्याचेही प्राथमिक तपासात आढळून आले आहे. बाहेर कोणी आत पिशवी फेकण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या रक्षकाभोवती पोलिसांनी तपासाचे फास आवळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed