• Mon. Nov 25th, 2024

    नागरिकांचा वाचणार वेळ अन् मनस्तापही! पोलिस आयुक्तांची भन्नाट कल्पना, अधिकारी बदलला तरीही मोबाइल नंबर तोच

    नागरिकांचा वाचणार वेळ अन् मनस्तापही! पोलिस आयुक्तांची भन्नाट कल्पना, अधिकारी बदलला तरीही मोबाइल नंबर तोच

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहरात अडचणीच्या वेळेस किंवा एखाद्या घटनेत संबंधीत पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिसांचे नंबर नसल्याने नागरिकांना पोलिसांशी संपर्क करता येत नाही. किंवा जुन्या पोलिस अधिकाऱ्यांना फोन जातात. ही अडचण सोडविण्यासाठी तसेच पोलिस आणि जनतेमधील सुसंवाद कायम राहावा. यासाठी वन युनिट, वन ऑफिसर आणि वन मोबाईल नंबर ही योजना पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी शहर पोलिस दलात राबविली आहे.शहर पोलिस आयुक्तालयात आयोजित करण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी ही अभिनव संकल्पनेची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे, शिलवंत नांदेडकर यांच्यासह प्रभारी पोलिस अधिकारी यांची उपस्थिती होती. या वेळी पोलिस आयुक्तांच्या हस्ते या उपक्रमांचे उदघाटन करण्यात आले. पोलिस निरीक्षक गौतम पातारे, गीता बागवडे यांच्यासह विनोद सलगरकर आणि राजश्री आडे यांना प्रातिनिधिक स्वरूपात नवीन क्रमांक असलेल्या बोर्ड देण्यात आले.

    या वेळी पोलिस आयुक्त लोहिया म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या विविध विभागांसह महावितरण विभागात कार्यरत असलेल्या प्रभारी विभाग प्रमुखांकडे एकच क्रमांक असतो. संबंधित अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर त्या अधिकाऱ्याकडे कार्यालयाचा क्रमांक दिला जातो. यामुळे जनतेला संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करणे सोपे जात आहे. हीच संकल्पना पोलिस विभागात राबविण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांपासून ते विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी विभाग; तसेच पोलिस ठाण्याप्रमाणे मोबाइल क्रमांक देण्यात आले आहेत. हे मोबाइल क्रमांक त्या विभागात कायमस्वरूपी राहणार आहेत. सदर नवीन क्रमांक हे एक जूनपासून कार्यान्वित होतील.’

    चौकात फिक्स पॉइंट

    शहरात अनुचित प्रकारावर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांनी विशेष योजना तयार केली आहे. या योजनेतंर्गत शहरातील ३४ चौकांत २४ तास पोलिसांचा फिक्स पॉइंट ठेवण्यात येणार आहे. यामुळे चौकात २४ तास पोलिस राहणार आहे. याशिवाय पोलिसांच्या टू मोबाइल व्हॅनमध्ये पाच पोलिस; तसेच पोलिस आयुधासह गस्त घालणार आहे. एखाद्या अनुचित प्रकाराच्या वेळी घटनास्थळी आसपासच्या पोलिस स्टेशनचे टू मोबाइल पोहोचून घटना नियंत्रित करण्याचा प्रयत्न पोलिसांचा राहणार आहे.

    ‘कुटुंबाला वेळ कधी द्यायचा?’

    पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांची वन मोबाइल नंबर या योजनेबद्दल काही पोलिस अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केला. मात्र सदर नंबर हा जनतेकडे जाणार असल्याने त्यांना २४ तास जनतेची फोन उचलावे लागणार आहे. यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना आपल्या कुटुंबासाठी थोडा फार मिळणारा वेळही मिळेल किंवा नाही, अशी शंका वर्तविण्यात येत आहे.

    पुण्यात अमली पदार्थांची तस्करी कुरिअरने; ऑनलाइन अ‍ॅपद्वारे खरेदी-विक्री उघडकीस, ५ जणांना अटक
    असे आहेत नवीन संपर्क क्रमांक

    पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्ष ९२२६५१४०१३
    पोलिस निरीक्षक सायबर ठाणे ९२२६५१४०१६
    पोलिस निरीक्षक, सिटी चौक ९२२६५१४०२४
    पोलिस निरीक्षक, क्रांती चौक ९२२६५१४०२५
    पोलिस निरीक्षक छावणी ९२२६५१४०२६
    पोलिस निरीक्षक, वाळूज ९२२६५१४०२७
    पोलिस निरीक्षक, एमआयडीसी वाळूज ९२२६५१४०२८
    पोलिस निरीक्षक, बेगमपुरा ९२२६५१४०२९
    पोलिस निरीक्षक, दौलताबाद ९२२६५१४०३०
    पोलिस निरीक्षक, वेदांतनगर ९२२६५१४०३१
    पोलिस निरीक्षक, सिडको ९२२६५१४०३२
    पोलिस निरीक्षक, जिन्सी ९२२६५१४०३३
    पोलिस निरीक्षक, जवाहरनगर ९२२६५१४०३४
    पोलिस निरीक्षक, एमआयडीसी सिडको ९२२६५१४०३५
    पोलिस निरीक्षक, मुकुंदवाडी ९२२६५१४०३६
    पोलिस निरीक्षक, उस्मानपुरा ९२२६५१४०३७
    पोलिस निरीक्षक, सातारा ९२२६५१४०३८
    पोलिस निरीक्षक, हर्सूल ९२२६५१४०३९
    पोलिस निरीक्षक, पुंडलिकनगर ९२२६५१४०४०

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed