• Sat. Sep 21st, 2024

पाटील कुटुंबात ३५ वर्षांनंतर आनंदी आनंद, सेलिब्रेशनसाठी मागवले हत्ती, ढोल-ताशे; पंचक्रोशीत चर्चा

पाटील कुटुंबात ३५ वर्षांनंतर आनंदी आनंद, सेलिब्रेशनसाठी मागवले हत्ती, ढोल-ताशे; पंचक्रोशीत चर्चा

कोल्हापूर : तब्बल ३५ वर्षानंतर घरामध्ये मुलीचा जन्म झाला म्हणून बापाने लेकीचं स्वागत चक्क हत्तीवरून मिरवणूक काढत केलं आहे. कोल्हापुरातील पाचगावमध्ये राहणारे गिरीश पाटील या कुटुंबियांनी आपल्या नवीन बाळाचे स्वागत ढोल ताशाच्या गजरात आणि सामाजिक संदेश देत हत्तीवरून मिरवणूक काढत केले आहे. या स्वागताची चर्चा सध्या पंचक्रोशीत होत आहे.आपल्या समाजात जिथे वंशाला दिवा पाहिजे असे म्हणत घरात मुलगी झाली की नाराज होणारी मंडळी आहेत. त्याच समाजात घरात मुलगी जन्मली म्हणजे लक्ष्मी आली असे म्हणत तिचे जंगी स्वागत करणारी मंडळीदेखील आहेत. सध्याच्या युगात प्रत्येक गोष्टीत मुली-मुलांच्या बरोबरीने उभे आहेत. अनेक जणांना घरात वंशाचा दिवा नसला तरी मुलगी हीच आपला वंशाचा दिवा म्हणत तिला मोठ्या प्रेमाने सांभाळतात. तर काही जणांच्या घरात मुलीच होत नसल्याने घरात एखादी तरी मुलगी असावी या विचारात काही जण नाराज होत असतात. असाच एक प्रत्यय कोल्हापुरात देखील आला आहे.

How To Exchange 2000 Note: २००० च्या नोटा खपवण्यासाठी लोकांचा इंडियन जुगाड, बँकेत जाण्याऐवजी पाहा काय काय केलं
कोल्हापुरातील पाचगाव येथे राहणारे गिरीश पाटील कुटुंबियांच्या घरात गेल्या ३५ वर्षांपासून मुलगीच जन्माला आली नाही. यामुळे पाटील कुटुंबियांमध्ये मुलीविषयी प्रेम होतं. गेल्या पाच महिन्यापूर्वी पाटील कुटुंबीयांच्या घरात एक गोंडस अशी मुलगी जन्माला आली आणि संपूर्ण कुटुंब आनंदी झालं. तर मुलीचे नाव देखील ईरा ठेवण्यात आले. दरम्यान, आज पाटील कुटुंबियांमधील ही गोंडस मुलगी म्हणजे ईरा पाचगाव येथील घरात पहिल्यांदाच येत होती. यामुळे तिचं जंगी स्वागत करायचं असं पाटील कुटुंबियांनी ठरवलं.

मुलीच्या जन्मानंतर नाकं मुरडणाऱ्यांनो, लेकीचं स्वागत असं कराचयं असतं…!

यामुळे आपल्या लाडक्या मुलीच्या स्वागतासाठी चक्क हत्ती आणला आणि हत्तीवरून मिरवणूक काढत तिचं घरामध्ये स्वागत केलं. यावेळी या मिरवणुकीत हत्ती बरोबरच ढोल ताशा आणि तुतारी, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवत आणि लहान-लहान मुलांना वेगवेगळ्या वेशभूषेत सजवत, हातात सामाजिक संदेश देणारे बोर्ड देण्यात आले होते. मुलीचे स्वागत इतक्या मोठ्या पद्धतीने होत असलेलं पाहून परिसरातील अनेक नागरिक याकडे कुतूहलाने पाहत होते. सध्या या मुलीची चर्चा पंचक्रोशीत सुरू असून या माध्यमातून मुलींविषयी असलेले प्रेम आणि यासोबतच एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न पाटील कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

Swarn Shatabdi Owner: रेल्वेची अशी चूक की भारताचा शेतकरी झाला थेट ट्रेनचा मालक, संपूर्ण किस्सा वाचून डोकं फिरेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed