• Sat. Sep 21st, 2024
Breaking वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर मुंबईतील दादर येथील आंबेडकर भवन परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. अज्ञातांनी लोखंडी रॉड, तलवार आणि चॉपर घेऊन हा हल्ला करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी दिली आहे. या हल्ल्याचा निषेध करत हा हल्ला म्हणजे आंबेडकर भवनावरचाच हल्ला आहे असे आम्ही मानतो आणि याचे आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ असे रेखाताई ठाकूर यांनी म्हटले आहे.आज, २७ मे रोजी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या कार्यकर्त्यांची बैठक होती. मुंबईत सध्या वंचित बहुजन आघाडीच्या सभा होत आहेत. पुढील सभा ही ३ जून रोजी होणार आहे. त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी ठिक ६.३० ते ७ च्या दरम्यान वंचितचे मुंबई युवा प्रदेश अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर आंबेडकर भवन परिसरात चार अज्ञातखोर इसमांनी लोखंडी रॉड, आणि तलवार, चोपर घेवून जीवघेणा हल्ला केला, असे वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Breaking शिवसेना आमदार लता सोनावणे यांच्या कारला मोठा अपघात, डंपरने दिली जोरदार धडक
जयदिश गायकवाड यांच्यावर संशयाची सुई- रेखाताई ठाकूर

या हल्ल्याचा निषेध करताना रेखाताई ठाकूर म्हणाल्या की, हा हल्ला परमेश्वर आणि रणशूर यांच्यावरील हल्ला नसून हा आंबेडकर भवनावरील हल्ला आहे. मागे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द बोलून आंबेडकर घराण्यासंबंधी अपशब्द बोलणाऱ्या जगदीश गायकवाड यांच्याकडे संशयाची सुई आहे.

धक्कादायक! तरुणीचा मृतदेह कपड्यात गुंडाळला, सेलोटेपने पॅक करून फेकला, मुंब्रा येथे खळबळ

चोख प्रत्युत्तर देऊ- ठाकूर

या हल्ल्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडी तर्फे आणि तमाम आंबेडकरी जनतेतर्फे निषेध व्यक्त करतो, असे रेखाताई ठाकूर म्हणाल्या. आंबेडकर भवनावरील हा हल्ला आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ. जनतेत या हल्ल्याबाबत संतप्त प्रतिक्रिया आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.
बैलगाडा मालकाचा नादच खुळा; चक्क फॉर्च्युनर गाडीतून आणली घोडी, लोक बघतच राहिले, पाहा व्हिडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed