• Sat. Sep 21st, 2024

२३ वर्षीय तरुणी अचानक गायब; ४ वर्षानंतर एक व्यक्ती समोर आली अन् बिंग फुटले, ३ आरोपी अटकेत

२३ वर्षीय तरुणी अचानक गायब; ४ वर्षानंतर एक व्यक्ती समोर आली अन् बिंग फुटले, ३ आरोपी अटकेत

भंडारा : कामाच्या ठिकाणाहून बेपत्ता झालेल्या अर्चना या तरुणीच्या मृत्यू प्रकरणात तब्बल चार वर्षांनंतर गोबरवाही पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या सदर घटनेत एस. पी. लोहित मतानी यांच्या आदेशावरून गोबरवाही पोलिसांनी घटनेतील सक्षीदाराच्या जबाबावरून तिघांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये संजय चित्तरंजन बोरकर (४७), राजकुमार उर्फ राजू चितरंजन बोरकर (५०, दोघेही राहणार- नेहरू वार्ड, कवलेवाडा) आणि धरम फागू सयाम (४२, रा. मोहगाव टोला) यांचा समावेश आहे.घटनेच्या दिवसापासून अद्यापही बेपत्ता असलेली अर्चना माणिक राऊत (२३) ही संशयित आरोपी संजय बोरकर यांच्या घरी कामाला गेली होती. मात्र परत न आल्याने गोबरवाही पोलिसात कुटुंबियांनी तशी तक्रार देखील नोंदविली होती. त्याच घटनेतील एकमेव साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या गुप्त माहितीतून अर्चनाच्या क्रूर हत्येची माहिती समोर आली. अद्यापही पोलिसांना अर्चनाचा मृतदेह आढळलेला नाही. मात्र परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी या प्रकरणातील तिघा आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानचे कलम ३०२, २०१ सह ३४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

सोबतचे विद्यार्थी पास होतील न् मी नापास; भीतीपोटी तरुणीनं जीव दिला, निकाल मात्र वेगळा लागला

पोलिसांनी तब्बल चार वर्षांनंतर अर्चनाचा खून झाला असल्याचा शोध लावला. आरोपींनी तिचा मृतदेह चिखला खाणीच्या प्रतिबंधित जागेवर संगनमत करून पुरला, अशी माहिती पोलिसांना दिली. सदर घटना २० एप्रिल २०१९ च्या रात्री १० वाजता घडली. त्यात साक्षीदाराला आरोपींनी घटनेच्या रात्री खोदकाम करणारे साहित्य मागितले होते. ते साहित्य देऊन साक्षीदाराने उत्कंठेच्या नादात आरोपींचा पाठलाग केला. त्याने अर्चनाचे प्रेत खाणीच्या जमिनीत पुरल्याचे कृत स्वतः बघितले असल्याचे सांगितले. मात्र आरोपींच्या धमकीमुळे घटना घडल्यानंतर ४ वर्ष तो काही बोलू शकला नाही. परंतु घटनेचे बिंग फुटले असले तरी युवतीचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

घटनेचे १४९७ दिवस आणि पोलिसांची दिरंगाई

घटनेच्या दिवशी आरोपींच्या घरी अर्चनाची आई गली असता तिने आपल्या मुलीचा पिवळा दुप्पटा व चप्पल बघतली होती. मात्र आरोपींनी तिला हाकलून लावले होते. त्यामुळे पोलिसांनी वेळीच नोंद घेऊन चौकशी केली असती तर अर्चनाच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा होण्यास १४९७ दिवसांचा विलंब झाला नसता, अशी चर्चा परिसरातील नागरिक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed