• Mon. Nov 25th, 2024
    महिला घरातून गायब, पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं; उसाच्या शेतात जाताच धक्कादायक प्रकार उघड

    दौंड: पत्नीचे अपहरण करून खून करत तिचा मृतदेह उसात लपवणाऱ्या नराधम पतीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दौंड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सुरेखा संतोष पवार असं खून झालेल्या पत्नीचं नाव असून संतोष पवार (वय २८) असं खून केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. संतोष पवार याच्यावर अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्याचे कलम लावण्यात आलं आहे. याबाबत चंदाबाई नाहिराज भोसले यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून दौंड पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, किरकोळ कारणावरून संतोष पवार याने आपल्या पत्नीचे अपहरण केले. त्यानंतर तिचा खून करत तिचा मृतदेह उसाच्या शेतात लपवून ठेवला आणि तो पसार झाला होता. याप्रकरणी चंदाबाई भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत पत्नीचा खून करणाऱ्या संतोष पवारला अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पत्नीचा मृतदेह आपण दौंड तालुक्यातील लोणारवाडी या गावच्या हद्दीतील वाळुंजकर यांच्या मालकीच्या शेतजमिनीवरील उसामध्ये ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर दौंड पोलिसांनी नातेवाईकांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर मृतदेहाची ओळख पटली.

    पतीशी घटस्फोट घेऊन २ मुलांच्या आईने केलं मुलीशीच लग्न, समलिंगी विवाहाची रोमँटिक लव्ह स्टोरी

    ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग स्वप्निल जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील दौंड पोलीस, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंभार, पोलीस हवालदार सुभाष राऊत, पोलीस हवालदार मलगुंडे, पोलीस हवालदार थोरात, पोलीस हवालदार विठ्ठल गायकवाड, पोलीस हवालदार गावडे, पोलीस नाईक अमीर शेख, पोलीस नाईक शरद वारे, पोलीस नाईक शैलेश हंडाळ, पोलीस नाईक भागवत, पोलीस कॉन्स्टेबल सागर गलांडे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश गोलांडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते यांनी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed