• Sat. Sep 21st, 2024
कोल्हापूर जिल्ह्यातील या शहराला मिळाला नवा पासिंग क्रमांक; आता फक्त MH 09 नाही तर…

इचलकरंजी: या पुढे तुम्ही एखाद्या रस्त्यावरून जात असाल आणि तुम्हाला अचानक MH 51 पासिंगची गाडी दिसली तर ही कोणत्या शहराच पासिंग आहे या विचारात तुम्ही पडला तर त्या आधीच आम्ही तुम्हाला याचे उत्तर सांगतो. तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याला MH 09 या आरटीओ पासिंगने देखील ओळखता, मात्र MH 51 हा नंबर देखील आता तुम्हाला कोल्हापूरची ओळख देणार आहे. कारण MH 51 हा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराला नव्याने ओळख मिळाली आहे. इचलकरंजी शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर आता इचलकरंजीसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे इचलकरंजीला MH 51 या नोंदणी क्रमांकसह नवीन कार्यालय मिळाला आहे.राज्यात एखाद वाहन कुठल्या जिल्ह्यातील आहे हे ओळखण्यासाठी आरटीओ विभागाकडून प्रत्येक जिल्ह्याला एक नंबर देण्यात आला आहे. या नंबर पासूनच प्रत्येक वाहनाचा पुढील नंबर ठरत असतो जसे की MH 01,MH 02, MH03, MH 12 तसा कोल्हापूर जिल्ह्याचा MH 09 हा नंबर आहे. मात्र गेल्या काही दिवसात कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्येमध्ये झालेली वाढ पाहता आणि यात विशेषतः इचलकरंजी शहरातील स्थिती पाहता राज्य सरकारने इचलकरंजी शहराला गेल्या काही महिन्यांपूर्वीच महानगरपालिकेचा दर्जा दिला आहे. यामुळे नगरपालिकेचे रूपांतर आता महानगरपालिकेत झाले आहे. तर आता राज्य सरकारने इचलकरंजी शहराला आणखी एक नवीन गिफ्ट दिला असून इचलकरंजी शहराला नवीन स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे इचलकरंजीत आता MH 51 या स्वतंत्र नोंदणी क्रमांक नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची उभारणी होणार आहे.

Akash Madhwal: आकाश मढवाल कसा काय ‘यॉर्कर किंग’ झाला? गुरू वसीम जाफरने सांगितली रियल स्टोरी
या कार्यालयासाठी आवश्यक पदे निर्माण केली जाणार आहेत. परंतू सध्या आवश्यक पदे इतर कार्यालयातून समायोजित केली जातील आणि कार्यालयासाठी जागा भाड्याने घेण्यासंदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयातून पुढील कारवाई होणार आहे. या कार्यालयाला एका इंटरसेप्टर वाहनाची देखील मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे इचलकरंजी शहराला मँचेस्टर सिटी बरोबरच आता MH 51 अशी नवीन ओळख मिळाली आहे.

GT vs MI : कशी असेल अहमदाबादची खेळपट्टी; गुजरातच्या घरच्या मैदानावर मुंबई समोर दुहेरी आव्हान
गेल्या काही वर्षात इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची मागणी वाढली आहे. तर येथील नागरिकांना आरटीओ संदर्भात कोणतीही कामे असतील तर ती करण्यासाठी त्यांना कोल्हापूर शहरात यावे लागायचे यामध्ये अनेक लोकांचा दिवस जायचा काम खोळंबायची, यामुळे गेल्या काही वर्षांपासून आमदार प्रकाश आवाडे इचलकरंजी शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन व्हावे यासाठी प्रयत्न करत होते आणि आता त्यांच्या प्रयत्नांना त्यामुळे यश आले आहे. या संदर्भातील जीआर जारी करण्यात आला आहे.

इचलकरंजी शहराला नवीन उपप्रादेशिक कार्यालय मंजूर झाले आणि MH 51 पासिंग मिळाला याचा मला मनापासून आनंद झाला आहे. शहराची लोकसंख्या पाहता गेल्या अनेक वर्षांपासून माझे प्रयत्न सुरू होते आणि या प्रयत्नांना शिंदे फडणवीस सरकारने यश दिले असून याचा मला प्रचंड आनंद होत आहे. मी त्यांचे आभार मानतो. इचलकरंजी हातकणंगले शिरोळ या भागातील लोकांसाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक सुद्धा उभा करण्यात आला आहे. त्याला सुद्धा मान्यता मिळाली असून यापुढे इचलकरंजीला स्वतंत्र तालुका म्हणून मान्यता मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

– प्रकाश आवाडे

गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदाची माळ ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळेंच्या गळ्यात, कार्यकर्त्यांचा जल्लोष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed