• Sat. Sep 21st, 2024
पंढरपूरसाठी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, महाराष्ट्रातील सर्वांत मोठा आराखडा मंजूर

सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापूर शहरातील हेरिटेज लॉन्समध्ये कार्यकर्त्यांचा संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला येणार असल्याने संमेलना ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरसाठी मोठी घोषणा केली.संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलनाला सोलापूर जिल्हाभरातून भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. पंढरपूर देवस्थानसाठी २७०० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. हा आराखडा मंजूर करण्यासाठी अंतिम मंजुरीसाठी पालकमंत्री विशिष्ट बैठका घेतील. या बैठकीत पंढरपूर येथील सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन काम सुरू होईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Solapur : भाजपचा मोठा मासा काँग्रेसच्या गळाला, पक्षप्रवेश करत नेत्याने आणला अंतर्गत वाद चव्हाट्यावर
दक्षिणेतील काशी असलेल्या पंढरपूरसाठी २७०० कोटींचा आराखडा

पंढरपूर हे दक्षिण भारतातील काशी आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे पंढरपूर आहे. महाराष्ट्र राज्यातील जनतेचे पंढरपूर हे दैवत आहे. काही दिवसांपूर्वी विठ्ठल मंदिरातील आतल्या भागातील विकासासाठी ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पंढरपूरसाठी एकूण २७०० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. २७०० कोटी रुपयांचा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आराखडा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नाना पटोलेंनी राष्ट्रवादीला डिवचलं, माढा लोकसभा मतदारसंघाबाबत केलं मोठं वक्तव्य
‘तीन डिजाइन तयार आहेत, त्यातील एक डिजाइन मंजूर होईल’

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी तीन डिजाइन तयार झाले आहेत. त्यातील एक डिजाइन पालकमंत्री बैठक घेऊन मंजूर करणार आहेत. हा आराखडा मंजूर करताना पालकमंत्री पंढरपूरच्या सर्व जनतेला विश्वासात घेऊन करतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महाराज, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राम सातपुते, भाजप शहर अध्यक्ष विक्रम देशमुख आदी मान्यवर आणि नेते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed