नांदेड : तेलगंणा राज्यातील बासरच्या देवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगातील कार उलटल्याने कारमधील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर पोलीस अधिकारी असलेल्या दांम्पत्यासह ३ जण जखमी झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील महामार्गावर गुरुवारी दुपारी हा अपघात घडला आहे. निर्मला राठोड असं मयत झालेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे.मुंबई येथील मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव, परभणी जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेली पत्नी कल्पना जाधव आणि निर्मलाबाई राठोड हे तिघे परभणीहून कारने बासरच्या देवीच्या दर्शनासाठी जात होते. जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील सीमेलगत असलेल्या वळण रस्त्यावर येताच वाहनचालक श्याम पवार याचा वाहनावरून ताबा सुटला आणि भरधाव वेगात असलेली कार तीन ते चार वेळा उलटून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील खड्यात जाऊन पडली.
Pune Accident : बसची धडक, भीषण अपघातात कार थेट दीडशे फूट खोल बोगद्यात उडाली; दोघे जागीच ठार
कारमधील निर्मलाबाई राठोड या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर पोलीस उपनिरीक्षक असलेले सुरेश जाधव आणि कल्पना जाधव तसेच कार चालक हे तिघेजण जखमी झाले. तिघांना हाता पायांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. चित्रपटातील दृश्याप्रमाणे हा अपघात झाला आहे. घटनेनंतर तिघांना धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करुण नांदेडला रवाना करण्यात आले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.Monsoon 2023 : मान्सूनसंबंधी मोठे अपडेट्स, हवामान खात्याने दिली सगळ्यांसाठी आनंदाची बातमी
निर्मलाबाई राठोड यांची इच्छा ठरली शेवटची…
निर्मलाबाई राठोड यांची तेलगंणा राज्यातील बासरच्या सरस्वती देवीच्या दर्शनाची खूप इच्छा होती. त्यांची ही इच्छा लेक आणि जावई पूर्ण करणार होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी तिघेजण हसतखेळत परभणीहून देवीच्या दर्शनासाठी रवाना झाले. मात्र, मंदिरापासून सात किलो मीटर दूर अंतरावरच जाधव कुटुंबियांवर काळाने घाला घातला आणि निर्मलाबाई राठोड यांची इच्छा शेवटची ठरली. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे.
WHO Warning : काय आहे ‘डिजीज X’? थेट WHO ने दिला अलर्ट; शास्त्रज्ञांच्या चिंतेने लोकांचं टेन्शन वाढलं