मात्र, अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रथमत: आग वस्तीमधे व शेजारील शाळेमध्ये पसरु न दिल्याने व सुमारे १० सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला. सकाळी आठ वाजेपर्यंत अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर २० अधिकारी व जवळपास १०० जवान आणि पुणे मनपा- पुणे कॅन्टोमेंट-पीएमआरडीए-पिंपरी चिंचवड अग्निशमन दल अशी एकुण जवळपास ३० अग्निशमन वाहने व खाजगी वॉटर टँकर दाखल आहेत. ही आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. या आगीत अद्याप जीवितहानी झालेली नसलेली तरीही या आगीत लाखोंचं नुकसान झालेले आहे. जवळच असलेल्या चार घरांना देखील या आगीची झळ पोहोचली आहे.
Pune News: पुण्यातील भवानी पेठ परिसरात भीषण आग लागली. या आगीत लाकडाच्या सात ते आठ वखारी जळून खाक झाल्या आहेत. ही आग विझवण्यासाठी अग्शिशमन दलाला प्रयत्नांची शर्थ करावी लागत आहे.
हायलाइट्स:
- पुण्यातील टिंबर मार्केटमधील लाकडांच्या गोडाऊनला भीषण आग
- अग्निशामन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी
- २० अधिकाऱ्यांसह १०० जवान आग विझवण्याचे काम करत आहेत
मात्र, अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रथमत: आग वस्तीमधे व शेजारील शाळेमध्ये पसरु न दिल्याने व सुमारे १० सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला. सकाळी आठ वाजेपर्यंत अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर २० अधिकारी व जवळपास १०० जवान आणि पुणे मनपा- पुणे कॅन्टोमेंट-पीएमआरडीए-पिंपरी चिंचवड अग्निशमन दल अशी एकुण जवळपास ३० अग्निशमन वाहने व खाजगी वॉटर टँकर दाखल आहेत. ही आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. या आगीत अद्याप जीवितहानी झालेली नसलेली तरीही या आगीत लाखोंचं नुकसान झालेले आहे. जवळच असलेल्या चार घरांना देखील या आगीची झळ पोहोचली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.