• Sat. Sep 21st, 2024
नांदेड हादरलं! गोदावरी नदीच्या काठावर कुजलेल्या अवस्थेत सापडले प्रेमीयुगुलाचे मृतदेह

नांदेड: जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका प्रेमीयुगुलाचा मृतदेह गावाच्या शिवारात गोदावरी नदी काठावर आढळून आला. मुगट गावात प्रेमीयुगुलाचा मृतदेह आढळला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. विकास धोंडिबा तुपेकर (वय २२) आणि ऋतुजा बालाजी गजले ( वय १८) असं या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.

पप्पा, आम्हाला वाचवा! हॉटेलच्या रुममधून तरुणीचा कॉल; लग्न ठरलेल्या कपलसोबत काय घडलं?

मयत विकास तुपेकर आणि ऋतुजा गजले हे दोन्ही युवक युवती मुगट गावातीलच रहिवाशी आहेत. दोघांचे घर एकमेकांसमोर आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेमसंबंधाची कुणकुण कुटुंबीयांना लागली होती. याच विषयावरून अनेकवेळा वाद होऊन विकासला मारहाण देखील करण्यात आली होती. मात्र, तरी ही दोघांमधील प्रेमसंबंध सुरूच होते. पाच दिवसांपूर्वी हे प्रेमीयुगुल अचानक बेपत्ता झाले होते . कुठे गेले याची कोणालाच माहिती नव्हती. गावात उलट सुलट चर्चा देखील सुरु झाली होती. अखेर २३ मे रोजी सायंकाळी त्यांचा मृतदेह गावातील गोदावरी नदीच्या काठावर कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या दोघांचा चेहरा देखील ओळखायला येत नव्हता. घटनेची माहिती मुदखेड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी मुदखेड पोलिसांनी आकास्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

लग्नानंतर ३ महिन्यांनी माहेरी गेलेल्या तरुणीनं आयुष्य संपवलं; विरहात पतीचं टोकाचं पाऊल

हत्या की आत्महत्या? चर्चेला उधाण

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विकास आणि ऋतुजाचा मृतदेह गावातील गोदावरी नदीच्या काठावर आढळला आहे. घनदाट असलेल्या काटेरी झुडपांच्या मध्ये दोघांचा मृतदेह आढळला आहे. या घटनेनंतर हत्या की आत्महत्या या बाबत आता गावात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. हत्या झाल्याचा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed