ग्रामस्थांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस असून, शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी एकरी १० हजार रूपये देण्याची विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी राज्य सरकारला केलेली शिफारस तत्काळ मंजुर करावी, तसेच अतिवृष्टी अनुदान तात्काळ वाटप करावे, तलाठ्याने प्रलंबित ठेवलेले शेत जमिनीचे शेकडो फेरफार तात्काळ मंजूर करावे,या प्रमुख मागण्यांसह हे उपोषण करण्यात येत आहे.अतिवृष्टीमुळे मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नुकसाभरपाई पोटी शासनाने अनुदान जाहीर केले.मात्र ८ महिने होऊनही हे अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाही.हे अनुदान तात्काळ वाटप करा.अंबिया बहराचा मंजूर फळपीक विमा तात्काळ खात्यावर जमा करावा आदी मागण्यासाठी शेकडो ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत.
आजचा उपोषणाचा दुसरा दिवस असून राज्य सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सरकार या बाबतीत जेवढा उशीर करेल तेवढी या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा उपोषणग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.