सहाव्या प्रयत्नात भावना एच एस यांनी पोस्ट काढली
२०१५ पासून भावना यांचा यूपीएससीचा प्रवास सुरु होता. २०१९वर्षी भावना मुलाखत पर्यंत गेल्या होत्या. २०२० मध्ये मुख्य परीक्षा देखील उत्तीर्ण होऊ शकल्या नव्हत्या. २०२२ मध्ये मोठ्या जोमाने ,अथक परिश्रम घेत,जिद्दीने परीक्षा देत देशात ५५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.त्यांच्या या मोठ्या यशाने सोलापूर मध्य रेल्वे विभागात सर्वस्तरातून कौतुक होत आहे.या यशाचे सर्व श्रेय भावना यांनी आईला दिला आहे. २०२२ साली झालेल्या परीक्षेत भावना यांनी अँथ्रोपोलॉजी हा वैकल्पिक विषय ठेवला होता.
बंगळुरू जिल्ह्यातील भावना कर्नाटक राज्यात अव्वल
सोलापूर मध्य रेल्वे विभागात कार्यरत असलेल्या भावना या मुळच्या बंगळुरू जिल्ह्याच्या आहेत.इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन या विषयात इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्या नंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाचा २०१५ पासून अभ्यास सुरू केला.घरची परिस्थिती बेताची व वडील नसल्याने मामाने पालनपोषण करत वाढवलं आणि इथपर्यंत आले.ज्या मामानी मला साथ दिली दुर्दैवाने करोना काळात दोन वर्षांपूर्वी मामाचा मृत्यू झाला आहे.यूपीएससीचा अभ्यास करताना आईने मोलाची साथ दिली होती अशी माहिती भावना यांनी दिली.
देशात ५५ वा क्रमांक मिळाल्याने भावना या कर्नाटक राज्यात अव्वल आल्या आहेत.पहिली पसंद आयएएस साठी आहे ,तसेच कोणत्याही प्रकारची कोचिंग न लावता हे यश संपादन केले आहे.यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हार्डवर्क ,सेल्फ स्टडीचा सल्ला दिला आहे.कोचिंग संस्था या मदत करू शकतात मात्र पास होण्याची जबाबदारी आपली असते असेही भावना यांनी माहिती दिली.