• Sat. Sep 21st, 2024
लग्नात वरुणराजा बरसला, ३५० ते ४०० वऱ्हाडी असलेला मंडपच कोसळला, क्षणात होत्याचं नव्हतं…

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उन्हामुळे कोल्हापूरकरांच्या जीवाची काहिली झाली होती. नागरिक दिवसभर उन्हाने आणि रात्रभर उकाड्याने वैतागले होते. मात्र, काल सोमवारी रात्री उशिरा कोल्हापूर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. एकीकडे या पाऊसामुळे वातावरणात काही काळ थंडावा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, दुसरीकडे सोसाट्याच्या वाऱ्याने कोल्हापुरातील गांधीनगर येथील लग्न मंडपाचे पत्रे उडून गेल्याची आणि मंडप कोसळल्याची धक्कादायक घटना घडली.या घटनेमध्ये अंदाजे तब्बल ३० ते ४० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापुरात काल मध्यरात्रीच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. तब्बल २ ते ३ तास धो-धो पाऊस कोसळत होता. या पावसाने कोल्हापूरला झोडपून काढले. पाऊसासोबत सोसाट्याचा वादळीवारा मोठ्या प्रमाणात असल्याने शहरातील गांधीनगरमधील आहुजा लॉनमध्ये लग्नासाठी लावण्यात आलेल्या लग्नमंडपाचे पत्रे हवेत उडाले आणि मंडपही कोसळला. यावेळी मंडपात वऱ्हाडी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Accident News: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनरचा ब्रेक फेल, लागोपाठ ७ वाहनांना उडवलं; गाड्यांचा भूगा
अचानक मंडप कोसळल्याने अनेकजण मंडपाखाली अडकले होते. यातील अंदाजे तब्बल ३० ते ४० लोक जखमी झाले असल्याची माहिती आहे. सर्व जखमींना तात्काळ रुग्णवाहिकाद्वारे रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या मंडपात सिंधी समाजातील एका कुटुंबाचा लग्न समारंभ सुरू होता. सकाळी लग्न पार पडले होते. मात्र, संध्याकाळी रिसेप्शन आणि संगिताचा कार्यक्रम असल्याने वऱ्हाडी मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होती. अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींनी आसऱ्यासाठी मंडपाकडे धाव घेतली.

टॉफी खाल्ली अन् तडफडू लागला ४ वर्षांचा चिमुरडा; आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत गेला जीव; कारण धक्कादायक
तब्बल ३५० ते ४०० वऱ्हाडी मंडपाखाली आसरा घेऊन उभे होते. मात्र, अचानक मंडप कोसळल्याने हे सर्व नागरिक मंडपाखाली अडकले. याबाबतची माहिती मिळताच सिंधी समाजातील अनेक सामाजिक संस्था त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर रेस्क्यू करत सर्वांना बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली. घटनास्थळी आठ ते नऊ रुग्णवाहिका त्वरित दाखल झाल्या. या रुग्णवाहिकांमधून दुर्घटनेतील जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या घटनेत गंभीर दुखापत कोणालाही झाली नाही. मात्र, ४ दुचाकींचं आणि ३ चार चाकींच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Vande Bharat : मुंबईकरांना वंदे भारत गिफ्ट, लोकल लवकरच होणार इतिहासजमा, वाचा काय आहे प्लॅनिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed