घटनास्थळी मदतकार्य सुरू असून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याशी जोळणारा आणि कमी अंतराचा मार्ग हा चांदशैली घाट आहे. या घाटावरुन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवासी वाहतूक होत असते. गेल्या दोन वर्षांपासून या घाटाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. जागोजागी रस्ता हा खचलेला असून नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. यातच खराब रस्त्यांमुळे हा भीषण अपघात झाला असल्याचं म्हटलं जात आहे. खचलेल्या रस्त्यांमुळे अजून किती प्रवाशांचा जीव प्रशासन घेणार आहे? असा संतप्त सवाल आता नागरिक करू लागले आहेत.