सोडत प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्जदारांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना अर्ज सादर करण्यासाठी २६ जूनपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्जासोबत उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम क्रेडिट, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंगच्या सहाय्याने २६ जून रात्री ११.५९ पर्यंत मुदत आहे. त्यासह अनामन रक्कमेसाठी आरटीजीएस, एनइएफटीमार्फत करण्यासाठी २८ जून रोजी बँकेच्या वेळेत भरता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ४ जुलै रोजी दुपारी तीन वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in व https://www.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाईल. ऑनलाइन दावे व हरकती ७ जुलै दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल करता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
संकेतस्थळांचा वापर करा…
अर्जदारांनी मार्गदर्शनासाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे. म्हाडाच्या सोडतीतील घरांविषयी https://housing.mhada.gov.in https://www.mhada.gov.in यावर माहिती प्रसिद्ध केली आहे. इच्छुक अर्जदारांनी संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.
एकूण सदनिका ४०८३
अत्यल्प उत्पन्न गट- २७९०
अल्प उत्पन्न गट – १०३४
मध्यम उत्पन्न मगट – १३९
उच्च उत्पन्न गट – १२०