• Mon. Nov 25th, 2024

    प्रामाणिकपणा सिद्ध करण्याच्या नादात अडचणीत, कोर्टातील त्या पुराव्यामुळेच वानखेडे गोत्यात?

    प्रामाणिकपणा सिद्ध करण्याच्या नादात अडचणीत, कोर्टातील त्या पुराव्यामुळेच वानखेडे गोत्यात?

    मुंबई: भ्रष्टाचारप्रकरणी सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) रडारवर असलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करुन समीर वानखेडे यांनी २२ मेपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळवण्यात यश मिळवले होते. मात्र, या सुनावणीवेळी आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी समीर वानखेडे यांनी याचिकेसोबत अभिनेता शाहरुख खान यांच्यासोबत झालेल्या संभाषणाची पुरावे जोडले होते. शाहरुखने आपला मुलगा आर्यनच्या सुटकेसाठी समीर वानखेडे यांच्याकडे विनंती केली होती. तेव्हा शाहरुख खानने समीर वानखेडे यांना प्रामाणिक अधिकारी म्हटले होते. याचाच दाखला देत वानखेडे यांच्या वकिलांनी शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप फेटाळून लावला. तसेच समीर वानखेडे किती प्रामाणिक आहेत, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्नही त्यांच्या वकिलांनी केला. मात्र, आता प्रामाणिकपणाचा हाच पुरावा समीर वानखेडे यांच्यासाठी मोठी अडचण ठरू शकतो.

    समीर वानखेडे यांनी कोर्टात अभिनेता शाहरूख खानसोबत केलेले ‘व्हॉट्सअॅप चॅट’ सादर केले होते. परंतु, अशाप्रकारे आरोपीच्या नातेवाईकांशी बोलणे नियमबाह्य आहे. समीर वानखेडे हे एनसीबीचे अधिकारी होते.एनसीबी यंत्रणेला याबाबत कोणतीही माहिती न देता आरोपीच्या नातेवाईकांसोबत चॅट करणे नियमबाह्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कोणत्याही आरोपी अथवा त्याच्या नातेवाईकांसोबत चर्चा करण्यापूर्वी संबंधित यंत्रणेची परवानगी घेणे आवश्यक असते. तसेच चर्चा झाल्यास त्याबाबत वरिष्ठांना अथवा यंत्रणेला माहिती देणे आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण या प्रकरणात असे झाले नाही. सीबीआयनेही वानखेडे यांना याबाबत कोणताही कल्पना दिली नव्हती, असे म्हटले आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे आरोपीच्या नातेवाईकांशी बोलल्याच्या मुद्द्यावरुन अडचणीत येऊ शकतात.

    प्लीज…बाप म्हणून मी तुमच्याकडे भीक मागतोय, शाहरुखने वानखेडेंना काय काय मेसेज केले? वाचा संपूर्ण चॅटिंग…

    अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर समीर वानखेडे शनिवारी सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. पहिल्या दिवशी त्यांची चार तास चौकशी झाली. तर दुसऱ्या दिवशी सीबीआयने तब्बल ५ तास समीर वानखेडे यांची कसून चौकशी केली. समीर वानखेडे यांची संपत्ती, महागडी घड्याळं, परदेश दौरे, वाशीतील जमिनीचा व्यवहार या मुद्द्यांवरुन समीर वानखेडे यांना प्रश्न विचारण्या आले.

    समीर वानखेडे यांच्याकडून विशेष सुरक्षेची मागणी जीवे मारण्याच्या धमक्या

    आपल्याला सातत्याने सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा समीर वानखेडेंनी केला आहे. सुरक्षेच्या बाबतीत आधीच पोलिसांना सांगितलं आहे. सोशल मीडियावर सातत्याने धमक्या येतच आहेत. मी त्यावर सीपी साहेबांशी (पोलीस आयुक्तांशी) चर्चा करेन. पण धमकीसत्र सातत्याने चालू आहे. त्यासाठी समीर वानखेडे यांनी विशेष सुरक्षेची मागणी केल्याची माहिती आहे.

    मुंबईत फ्लॅट, गावात जमीन, लाखावर पगार, समीर वानखेडेंची एकूण संपत्ती किती?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed