सोलापुरात भाजपमध्ये दोन आमदार देशमुखांमधील अंतर्गत वादामुळे कंटाळलो होतो. फेब्रुवारी २०१७ मध्ये सोलापूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली होती. सत्ता आल्यापासून सोलापूरच्यया भाजपमध्ये दोन देशमुख गट निर्माण झाले. याचा फटका सोलापूरच्या विकासावर झाला अशी खंत यावेळी प्रा. अशोक निंबर्गी यांनी व्यासपीठावर असताना व्यक्त केली.
आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ‘कमळ’ सोडून त्यांनी आता काँग्रेसचा ‘हात’ हातात घेतल्याने सोलापुरात एकच चर्चा होती. अशोक निंबर्गी यांची मनधरणी करण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केला होता.
निंबर्गी भाजपचे स्वीकृत नगरसेवक
प्रा. निंबर्गी हे पूर्वी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. नंतर देशमुख यांच्याशी बिनसल्याने ते आमदार सुभाष देशमुख यांच्या गटात सहभागी झाले. तेव्हापासून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधातील गट म्हणून अशोक निंबर्गी यांच्यासह इतर सहकाऱ्यांकडे पाहिले जायचे. मात्र गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्याचे प्रा. निंबर्गी यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात मात्र गायीवरून राजकारण : नाना पाटोले
भाजपचे नेते आशीष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरें आरे कॉलनीत गाई म्हशी कापू देणार का? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला होता. कर्नाटकातही काँग्रेसने गाई, म्हशी कापण्याच्या नंगा नाच केला, असेही शेलार म्हणाले. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी भाजपच्या नेत्यांना सवाल केला आहे. केरळ राज्यात गाय तुमची काय लागते, गोवा राज्यात गाय काय लागते, ईशान्येतील राज्यात गाय काय लागते? या सर्व प्रश्नांची उत्तरे भाजपने प्रामाणिकपणे द्यावी. धार्मिक तेढ निर्माण करून निवडणgका जिंकता येणार नाहीत, असे नाना पाटोले म्हणाले. सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. गाय त्यांची आई कधी झाली नाही. गाईच्या नावाखाली राजकारण करतात, अशी टीका नाना पाटोले यांनी भाजपवर केली.