• Sat. Sep 21st, 2024
Raigad Crime: औरंगाबादच्या सरकारी इंजिनिअर तरुणीने रायगडमध्ये आयुष्य संपवलं, चिठ्ठीत लिहून गेली…

रायगड : अलीकडे युवा पिढीमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण हे वाढायला लागलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना कोकणातल्या रायगड जिल्ह्यात गोरेगाव येथे घडली आहे. महावितरण कार्यालयात नोकरीला असलेल्या २८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली? हे अद्याप समजू शकलेलं नाही.

गोरेगाव येथे एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिलाशा अभिमन्यू शेळके (वय २८, रा. मूळ औरंगाबाद) असं या आत्महत्या केलेल्या युवतीचं नाव आहे. गेले जवळपास ३ ते ४ वर्षापासून ही तरुणी येथील महावितरण कार्यालयात कार्यरत होती. दरम्यान, आत्महत्येच्या आधी या तरुणीने एक चिठ्ठी देखील लिहिली असून ती गोरेगाव पोलिसांनी जप्त केली आहे. “माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये. हा निर्णय मी स्वतःहून घेतला आहे”, असं तीने आपल्या आई-वडिलांच्या नावाने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.

गुजरातविरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का, स्टार गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर
मृत अभिलाषा शेळके गोरेगाव येथील कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत होती. महावितरणच्या गोरेगाव येथील वसाहतीत ही युवती एकटीच राहत होती. राहत असलेल्या ठिकाणी शुक्रवारी १९ मे रोजी अभिलाशा हिने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. गोरेगाव पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उभारे करत आहेत.

सतेज पाटलांना आता बंटी म्हणणं बंद करा, अजित पवारांनी भरसभेत मुद्दा काढला, कारण सांगितलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed