• Sat. Sep 21st, 2024

ठाण्यात बालकांवरील अत्याचार वाढले; बलात्काराचे ३१९, अपहरणाचे १०२७ गुन्हे दाखल

ठाण्यात बालकांवरील अत्याचार वाढले; बलात्काराचे ३१९, अपहरणाचे १०२७ गुन्हे दाखल

म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरातही बालके सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात दोन वर्षांत बालकांवरील बलात्कार आणि अपहरणांच्या गुन्ह्यात वाढ झाली असून यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.कधी नात्यातील किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून तर कधी अनोळखी व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचारांना बालकांना सामोरे जावे लागते. ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. २०१९-२० मध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात बालकांवरील अत्याचाराच्या २५९ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यानंतर २०२०-२१ मध्ये हा आकडा ३११, तर २०२२-२३मध्ये तो ३१९वर गेला. अपहरणाच्या ९३६ गुन्ह्यांची नोंद २०१९-२० मध्ये झाली होती. हे गुन्हे २०२०-२१मध्ये ९८२ आणि २०२१-२२मध्ये एक हजार २७ झाले. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण व्हावा, यासाठी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याणात अधिक घटना

ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा विचार केला, तर बालकांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये सर्वाधिक गुन्हे ठाणे, भिवंडी आणि कल्याण तालुक्यात नोंदवण्यात आल्याचे आकडेवरीवरून स्पष्ट होत आहे.

बालकांविरोधातील गुन्हे

तालुका बलात्कार अपहरण व पळवून नेणे

– २०२०-२१ २०२१-२२ २०२०-२१-२०२१-२२

ठाणे १०१ १३४ ३८७ ४८८

भिवंडी ८० ६१ १५२ १६४

शहापूर १६ ०५ २५ –

कल्याण ५२ ५५ २०६ १६६

उल्हासनगर १२ १२ ५० ८४

अंबरनाथ ३० ३५ ८७ १२५

मुरबाड २० १७ ७५ –

एकूण ३११ ३१९ ९८२ १,०२७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed