• Sat. Sep 21st, 2024

सासऱ्याचा मृत्यू, डोळ्यातील अश्रू थांबायच्या आधी दोन्ही सुनाही गेल्या, कुटुंबातलं चैतन्य गेलं

सासऱ्याचा मृत्यू, डोळ्यातील अश्रू थांबायच्या आधी दोन्ही सुनाही गेल्या, कुटुंबातलं चैतन्य गेलं

सोलापूर: पंढरपूर तालुक्यातील पुनर्वसन टाकळी गुरसाळे येथे गुटाळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. पुनर्वसन टाकळी येथील ज्ञानदेव मनोहर गुटाळ (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने १९ मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले होते. टाकळी पुनर्वसन येथील नागरिकांचे पुनर्वसन झाल्यामुळे त्यांचे नातेवाईक बहुतांश हे करमाळा, परांडा, बारामती या भागात वास्तव्यास आहेत. त्यामुळे नातेवाईकांना अंत्यविधीस येण्यास उशीर झाला होता.ज्ञानदेव गुटाळ यांच्यावर रात्री साडे अकरा वाजता अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधी करून परत येताना गर्दीत ट्रक घुसला आणि या अपघातात मृत ज्ञानदेव यांच्या दोन्ही सुनांचा मृत्यू झाला आहे. मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय ५०), हिराबाई भारत गुटाळ (वय ४५) या दोन सुनांचा मृत्यू झाला आहे. मुक्ताबाई यांचा उपचार दरम्यान दवाखान्यात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, पती असा परिवार आहे. तर हिराबाई भारत गुटाळ (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Rinku Singh: रिंकूने ती एक चूक केली नसती तर KKR ने इतिहास रचला असता…
गर्दीत ट्रक घुसला आणि मोठा अनर्थ घडला

अंत्यविधी करून सर्वजण घराकडे परत येत असतानाच गावाच्या ओढ्याजवळ करकंबकडून या क्रमांकाचा एक ट्रक महिलांच्या गर्दीत घुसला आणि एकच कल्लोळ माजला. या अपघातात दोन जावांचा मृत्यू झाला आहे. तर पाच नातेवाईक जखमी झाले आहेत. रात्री साडेअकरा वाजता हा अपघात झाल्याने परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. उपस्थित नातेवाईक आणि ग्रामस्थ यांनी अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने पंढरपूर जवळील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार साठी दाखल केले. याच दरम्यान पंढरपूर पोलिसांचे गाडी पेट्रोलिंग साठी आली होती. पोलिसांना ही तात्काळ जखमींना दवाखान्यात हलवण्यास मदत केली आणि ट्रक चालकास ताब्यात घेतले.

अक्षता घेऊन सारे तयार, वर-वधूच्या हातात हार; पण तेवढ्यात ती म्हणाली, लग्न नाही करणार, कारण…
जखमींवर उपचार सुरू

या अपघातात मृत ग्यानदेव यांच्या दोन्ही सुनांचा मृत्यु झाला आहे. मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय ५०) यांचा उपचारादरम्यान दवाखान्यात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात
एक मुलगा, दोन मुली, पती असा परिवार आहे. तर हिराबाई भारत गुटाळ (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलं, सुना, नातवंडं असा परिवार आहे. हिराबाई या सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. या अपघातात ज्ञानदेव यांची मुलगी सुधमती धुमाळ (४५ रा.लिंबोडी.ता.बारामती), अनिता देवकर (३५ रा.सुगाव भोसे), सुनिता महादेव गुटाळ (५० रा. चिखठाणा ता. करमाळा), आनंदबाई धनंजय साळुंखे (४२ रा.चिखठाणा ता. करमाळा) आणि दत्तात्रय अजिनाथ सरडे (४० रा. चिखठाणा ता. करमाळा)अशी जखमींची नावे आहेत.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

टाकळी पुनर्वसन गावावर शोककळा

सासऱ्याच्या अंत्यविधीवरून परत येताना दोन्ही सुनांचा अपघातात मृत्यू झाला आहे अपघाताने संपूर्ण टाकळी गावावर शोककळा पसरली आहे.अपघातातील जखमींना खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यासाठी ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागून काढली.या अपघाताने हसते खेळते गुटाळ कुटुंबीय दुःखात बुडाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed