म.टा. प्रतिनीधी, छत्रपती संभाजीनगर : व्हॉटसअपवर वर्क फ्रॉम होमची विशेष ऑफरचा मेसेज पाठवून, युटयूबचे टास्क पुर्ण करा. आणि घरबसल्या पैसे कमवा. अशी योजना मांडली. सदर महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरवातीला काही पैसे पाठविण्यात आले. मात्र यानंतर जवळपास १ लाख तीन हजार रुपये ऑनलाइन जमा करून महिलेची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुनहा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात एमआयडीसी वाळुज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी दुपारी १२.२० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने टेलीग्राम या सोशल नेटवर्कींग साईटवर ऑनलाइन यू-ट्यूबचे टास्क पूर्ण करण्याचे सांगितले. यातून चांगले उत्पन्न मिळेल असे सांगण्यात आले. १५ मार्च रोजी टास्क पूर्ण केल्यावर १५० रुपये खात्यावर आले. यानंतर ४००, १००० रुपये, १३०० मिळाले. महिलेचा विश्वास बसल्यानंतर संबंधित ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्यांनी संबंधीत महिलेला आणखी पैसे वाढवून देण्यासाठी सांगितले. यानंतर सदर महिलेने एका बँक खात्यावर एक लाख तीन हजार रुपये भरले. यानंतर संबंधीतांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. या प्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० मार्चला दिली होती सायबर पोलिसांकडे तक्रारसदर महिलेला आकर्षक परतावा मिळण्याचे आमिष दाखवून एक लाख तीन हजाराची खात्यावर टाकण्यास भाग पाडले. ही फसवणूक लक्षात येताच, सदर महिलेने सायबर पोलिस ठाणे पोलिस आयुक्त कार्यालयात जाऊन तक्रार नोंदविली, अशीही माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.