• Sat. Sep 21st, 2024

६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, हत्येनं ठाणे हादरलेलं, त्या प्रकरणात पोलीस कमी पडले

६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, हत्येनं ठाणे हादरलेलं, त्या प्रकरणात पोलीस कमी पडले

ठाणे: एका ६ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेल्या एका आरोपीचा गुन्हा आणि फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. महाराष्ट्रात ठाणे येथे २०१०मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणाच्या तपासकामी झालेल्या असंख्य चुका व त्रुटींमुळे या पाशवी घटनेतील गुन्हेगारास योग्य ती शिक्षा देण्याचा मार्ग खुंटला, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. या लहानगीवर बलात्कार करून तिची हत्या करत तिचा मृतदेह एका नाल्यात फेकून दिल्याचा आरोप या आरोपीवर करण्यात आला होता.याप्रकरणी जून २०१० मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. या खटल्यात कनिष्ठ न्यायालयाने नोव्हेंबर २०१४मध्ये या आरोपीवरील गुन्हा निश्चित करत त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१५मध्ये ही शिक्षा कायम ठेवली. या निर्णयास या दिला. आरोपीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Rinku Singh: रिंकूने ती एक चूक केली नसती तर KKR ने इतिहास रचला असता…
न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या गुन्ह्याच्या पोलिस तपासात अनेक त्रुटी असल्याचे दिसत असून त्यामुळे हा खटला कमजोर झाला. यामध्ये मांडण्यात आलेल्या घटनाक्रमाच्या विविध टप्प्यांमध्ये बरेच अंतर असल्याचे आढळत आहे. या सर्व प्रकारामुळे आरोपीचा गुन्हा निश्चित करणे अतिशय कठीण होऊन बसले, असे या खंडपीठाने सांगितले. या आरोपीवर अन्य काही गुन्ह्यांची नोंद नसेल तर त्याला त्वरित मुक्त करावे, असा आदेशही या खंडपीठाने दिला.

कोवळ्या वयातील प्रेम! ७ वीच्या विद्यार्थ्याचं ८ वीतील मुलीशी अफेअर, नको ते करुन बसले, रुग्णालयात जाताच धक्का
डीएनए अहवालही शंकास्पद

हा खटला साक्षीवर आधारलेला नाही. आरोपीने दिलेला कबुलीजबाब, जप्त केलेले काही नमुने व शास्त्रीय विश्लेषणे याच्या आधारे ही शिक्षा सुनावण्यात आली. यातील डीएनएसंबंधी पुराव्यांच्या विश्वसनीयतेवर शंका घेण्यास वाव आहे, असे या खंडपीठाने स्पष्ट केले. या घटनास्थळी गोळा करण्यात आलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी कमालीचा विलंब झाला. या विलंबाचे कारणही सांगण्यात आले नाही. या आरोपीने दिलेला कथित कबुलीजबाब त्याला त्याच्या मातृभाषेत वाचून दाखविण्यात आला नाही, अशी टिप्पणीही खंडपीठाने केली.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed