• Sat. Sep 21st, 2024

अँटॉप हिल पोलिस ठाण्यात वकिलांना अत्यंत निर्दयपणे मारहाण; कारण फक्त इतकेच की…

अँटॉप हिल पोलिस ठाण्यात वकिलांना अत्यंत निर्दयपणे मारहाण; कारण फक्त इतकेच की…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सोसायटीतील एका वादाविषयी अँटॉप हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेलेले अॅड. हरिकेष शर्मा व अॅड. साधना यादव या दोन्ही वकिलांना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांनी गुरुवारी अत्यंत निर्दयपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकाराचा मुंबईतील अनेक वकील संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. तसेच, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याबरोबरच मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला तसेच केंद्रीय विधी न्यायमंत्री, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई पोलिस आयुक्तांकडे याबद्दल लेखी तक्रार देण्याची तयारी वकील संघटनांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

‘अँटॉप हिलमधील दोस्ती शॉपी लिंकमधील एका वादाबाबत तक्रार करण्याकरिता हे दोन्ही वकील गुरुवारी दुपारी पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुलकर्णी व त्यांच्या सहकारी पोलिसांनी दोन्ही वकिलांना वरच्या मजल्यावरील खोल्यांमध्ये नेऊन मारहाण केली. त्यानंतर दोघांना दहशतीखालीच सायन रुग्णालयात नेऊन वेगळी कारणे दाखवत उपचार करवून पुन्हा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तसेच, दोघांना मध्यरात्रीपर्यंत डांबून ठेवत त्यांना पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली’, असा आरोप आहे. अमानुष मारहाणीमुळे अॅड. साधना यांच्या पायाला व कानांना गंभीर दुखापत झाल्याने त्या सध्या सायन रुग्णालयात उपचार घेत आहेत.

‘अॅड. साधना या तक्रार मांडत असताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी त्यांना आवाज खाली करा, असे सांगितले आणि त्यांनाच धमकावले. म्हणून इथे आपल्याला न्याय मिळणार नाही, असे म्हणत आम्ही दोघेही पोलिस ठाण्यातून बाहेर पडत असतानाच कुलकर्णी यांनी, ‘यांना वर घ्या रे’, असे म्हणत कनिष्ठ पोलिसांना आदेश दिला. त्यानंतर आम्हा दोघांनाही वरच्या मजल्यावर वेगवेगळ्या खोल्यांत नेऊन अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आली’, असे अॅड. शर्मा यांनी ‘मटा’ला सांगितले.

Chhatrapati Sambhajinagar: एक हिरो आया, उसे भी सबक सिखाव! भांडण सोडवायला गेलेल्या व्यापाऱ्याला चाकुने भोसकलं
पोलिसांकडून वकिलांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. वकील हे समाजासाठी काम करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर अशाप्रकारे हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.- अॅड. उदय वारुंजीकर, सदस्य, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed