• Mon. Nov 25th, 2024

    ‘तिचा’ बोलविता धनी कोण? गणेश नाईकप्रकरणी चौगुले यांचा सवाल

    ‘तिचा’ बोलविता धनी कोण? गणेश नाईकप्रकरणी चौगुले यांचा सवाल

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांच्यावर दीड वर्षापूर्वी लैंगिक शोषणाचा जाहीर आरोप करणाऱ्या दीपा चौहान या महिलेने नुकतेच या प्रकरणातून घूमजाव केले आहे. तसेच आमदार मंदा म्हात्रे व बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या सांगण्यावरून मी आमदार नाईक यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केल्याचा लेटरबाँम्ब टाकला आहे. या पत्रामुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.या महिलेने केलेल्या आरोपांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी खंडन केले असून या महिलेला धाकात ठेवून असे आरोप करायला लावणारा तिचा बोलावता धनी कोण, याचा तपास होणे गरजेचे असल्याचे चौगुले म्हणाले. यासाठी मी परिमंडळ-१चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांना लवकरच भेटून पत्र देणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

    हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अचानक या महिलेने आरोप मागे घेत असल्याबद्दलचे पत्र पोलिसांना दिले आहे. त्यामुळे सर्वप्रथम चौहान यांना पोलिस संरक्षण देण्याची आणि या महिलेची नार्को चाचणी करण्याची मागणी मी पोलिसांकडे करणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले. याशिवाय या प्रकरणात आमचे नाव कोणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आले, याचा शोध घेण्यासाठी मी न्यायालयातदेखील जाणार असल्याचे चौगुले म्हणाले.

    Pune Crime : माझा नवरा हरवला, पुण्यातील विवाहिता पोलिसात; दोन दिवसांनी विहिरीत बॉडी सापडताच ‘लफडं’ उघड
    निवडणुका जवळ आल्या की विजय चौगुलेला लक्ष्य करायचे, असे ठरावीक लोकांचे कायमचे धोरण राहिले आहेत. कोणत्या तरी प्रकरणात विजय चौगुले यांचे नाव आले म्हणजे निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असे समजायचे, असा आरोप चौगुले यांनी केला. त्यानंतर चौगुले यांनी लेटरबॉम्बनंतर आलेल्या निराशेसंदर्भात आणि कुटुंबीयांकडून होत असलेल्या दबावाबाबत या महिलेने त्यांच्यासोबत केलेले संभाषण पत्रकारांना ऐकवले. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख किशोर पाटकर, माजी नगरसेवक रामाशीष यादव, जगदीश गवते, ममित चौगुले, आकाश मढवी, रामचंद्र पाटील, अजित सावंत आदी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed