• Sat. Sep 21st, 2024
माझा मुलगा जनतेची सेवा करायचा, दादा त्याला न्याय द्या, किशोर आवारेंच्या आईचा आक्रोश

मावळ : तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची तीन दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत आरोपींना अटक केली. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आवारे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले आणि किशोर आवारे यांना श्रद्धांजली अर्पण केली.या भेटीदरम्यान किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी माझा मुलगा तळेगावकरांची प्राणपणाने सेवा करत होता. तळेगावकरांना न्याय पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. तसेच या हत्या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्याची मागणी किशोर आवारे यांच्या पत्नीने पाटील यांच्याकडे केली आहे. आवारे यांच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो अशी प्रार्थना चंद्रकांत पाटील यांनी केली.

बंदूक हरवल्याचं नाटक, पोलिसांत तक्रारही दिली, अन् त्याच बंदुकीने… आवारेंना कसं मारलं, आरोपींनी सगळं सांगितलं!
चंद्रकांत पाटील यांनी आवारे कुटुंबाला धीर दिला. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देखील आवारे कुटुंबियांना दिली. यावेळी भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलिसांनी सूत्रे फिरवली, २४ तासांच्या आत कारवाई, आवारेंच्या खून प्रकरणात ५ आरोपींच्या मुसक्या आवळल्या
का झाली होती हत्या??

माजी नगरसेवक भानुदास खळदे यांच्याशी किशोर आवारे यांचा वाद झाला होता. त्यावेळी आवारे यांनी खळदे यांच्या कानाखाली मारली होती. त्याचा राग खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याच्या मनात होता. त्याच रागातून गौरव याने कट रटत मित्रांना सुपारी देऊन नगर परिषदेच्या कार्यालयासमोर आवारे यांना गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून त्यांचा खून केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed