• Sat. Sep 21st, 2024
Pune Crime : साताऱ्याहून नातीला भेटायला आल्या, आजीची पुण्यात दगडाने ठेचून हत्या; पुण्यात खळबळ

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ५० वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. थोपतावाडी परिसरात हा प्रकार घडला आहे. या घटनेनं पुरंदर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. थोपटेवाडी परिसरातील पाझर तलावाच्या शेजारी हा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. संगीता शरद करे (वय ५०) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून या संदर्भात महिलेच्या जावयाने जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की, थोपटेवाडी परिसरातील पाझर तलावाशेजारी एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केली असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे

लखनौच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ जाहीर, रोहितने कोणाला संधी दिली पाहा…
या महिलेची ओळख पटवताना पोलिसांना माहिती मिळाली की, मृत झालेली महिला सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कापडगाव येथील आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

मृत महिलेच्या मुलीचा पिसुर्टी येथील गोपीनाथ जगन्नाथ बरकडे यांच्याशी विवाह झाला आहे. त्यामुळे मुलीला भेटण्यासाठी त्या अनेक वेळा पिसुर्टी येथे यायच्या. मात्र, त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. यावेळी त्या आपल्या नातीला भेटायला आल्या होत्या. मात्र, त्यांचा कोणीतरी दगडाने ठेचून हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. थोपटेवाडी येथील पाझर तलावाच्या बाजूला त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांच्या मृतदेहाच्या बाजूला दोन मोठे दगड पडलेला असून त्याला रक्त लागलेलं होते. त्यामुळे दगडाने ठेचून ही हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृत महिलेचा जावई गोपीनाथ बारकडे यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी कलम ३०२ आणि २०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर करत आहेत.

प्रेमविवाहानंतर पतीचा मृत्यू, धक्का सहन न झाल्याने पत्नीचं टोकाचं पाऊल; एकत्रच निघाली अंत्ययात्रा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed