• Sat. Sep 21st, 2024
लेकच बापाच्या जीवावर उठला! शेतीच्या वादावरुन जन्मदात्याची हत्या; झोपेत धारदार शस्त्राने वार

वाशिम : शेतीमध्ये वाटा आणि पैसे देत नसल्यामुळे संतापलेल्या एका मुलाने आपल्या ७० वर्षीय वडिलांची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. ही संतापजनक घटना रिसोड तालुक्यातील वाडी वाकद परिसरामध्ये घटना घडली आहे. भगवान बाबा संस्था इथे वास्तव्यास असणाऱ्या आत्माराम मुंढे यांच्यासोबत त्यांचा मुलगा संजय मुंढे यांचं काल रात्री शेतीमधील वाटा आणि पैसे देण्यावरुन भांडण झालं.

संजय मुंढेनं बाबा मंदिर परिसरामध्ये झोपलेल्या आपल्या वडिलांवर धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या केली. वडिलांची हत्या केल्यानंतर मुलगा संजय हा गावातून फरार होता. ही घटना आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास पिंपरखेडच्या भगवानबाबा संस्थान येथे उघडकीस आली. ह्या निर्दयी मुलाला ताब्यात घेऊन पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

कोकणात जात असाल तर ही बातमी वाचायलाच हवी, पर्यटकांना होतोय मनस्ताप, जाणून घ्या कारण
याबाबत मृतक आत्माराम मुंढे यांचा भाऊ रामकिसन मुंढे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, त्यांचा भाऊ आत्माराम हे गेल्या १० वर्षांपासून रिसोड तालुक्यातील पिंपरखेड, वाडी, वाकद, बोरखेडी येथील भगवानबाबा संस्थानमध्ये पूजा अर्चा करत होते. मयत आत्माराम यांचा आरोपी मुलगा संजय हा व्यसनाच्या आहारी गेलेला होता आणि वडिलांकडे सतत पैशांची मागणी करत होता.

पैसे न दिल्यास वाद घालायचा किंवा जीवे मारण्याची धमकी द्यायचा. १५ मे म्हणजेच कालच पिता-पुत्रांमध्ये पैशांच्या कारणावरून पुन्हा खटके उडाले होते. तेव्हा मृताच्या बहिणीने संजयची समजूत घातल्यानंतर त्याला तेथून काढूले होते. वडिलांनी पैसे न दिल्याचा राग मनात ठेऊन संजयने १५ मे रोजी रात्री धारदार शस्त्राने वडिलांची निर्दयीपणे हत्या केली. आज सकाळी लोक पूजेसाठी मंदिरात गेले असता ही घटना उघडकीस आली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली असून आरोपी संजय मुंढे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रिसोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

सामना सुरु होण्यापूर्वी मुंबईसाठी गुड न्यूज, मॅचविनर खेळाडूची करो या मरो सामन्यात एंट्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed