काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी आणि भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पॅनलच्या माध्यमातून उमेदवार रिंगणात उतरवले होते. शेवटपर्यंत ही निवडणूक अटीतटीची ठरली होती.
सोमवारी सकाळी मजूर फेडरेशनच्या कार्यालयात मतमोजणी पार पडली. यामध्ये महाविकास विकास आघाडीचे ९ उमेदवार विजयी झाले. तर भाजपाने ६ जागेवर विजय मिळवला. भाजपाच्या दोन उमेदवारांचा ईश्वर चिठ्ठीने विजय झाला आहे.
विजयी उमेदवारांचा पक्षातील नेत्यांकडून सत्कार करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रमाणे मजूर फेडरेशनची निवडणूकही चुरशीची ठरली. मागील काळात काँग्रेसची एकहाती सत्ता होती. परंतू यावेळी शिवसेना-भाजप युतीने लेबर फेडरेशन निवडणुकीत सहा जागा मिळवत प्रवेश मिळवल्याने आगामी काळात मोठा राजकीय संघर्ष पाहावयास मिळेल असे देखील बोलले जात आहे.
महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार
लक्ष्मीकांत गोणे (२३ मते ), प्रदीप पाटील ( १७ मते ), अनिता येवले (१०९ मते ), उत्तम राठोड (९ मते ), मुकुंद जवळगाव (१२३ मते ), शाहूराज गायकवाड (१३५ मते ), भारत रैपणवार (१२६ मते ), साजेदा बेगम शौकत खान (१२८ मते ) घेऊन विजयी झाले तर रामलू इलपेवार हे देगलूर मधून बिनविरोध निवडणून आले.
भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार
मिलिंद देशमुख (२० मते), प्रताप सोळंके (६ मते ), दिगंबर पवळे (८ मते ) घेऊन विजयी झाले आहे. रामराव सूर्यवंशी हे बिनविरोध निवडून आले. तसेच भाजपाचे मनोहर भोसीकर आणि उमाकांत दगडे हे ईश्वर चिठ्ठीमुळे विजयी झाला आहे.