• Mon. Mar 16th, 2026

    अजित दादांच्या हस्ते भूमिपूजन; फडणवीसांकडून उदघाटन, चिंचवडमध्ये ‘युती’ पॅटर्नची चर्चा

    अजित दादांच्या हस्ते भूमिपूजन; फडणवीसांकडून उदघाटन, चिंचवडमध्ये ‘युती’ पॅटर्नची चर्चा

    पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी आज पिंपरी चिंचवड येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

    दादा, तुम्ही आमच्या हक्काचे; पवारांपेक्षा ठाकरेंकडे रडा सांगणाऱ्या अजित पवारांना सुषमा अंधारेंचं उत्तर

    उदघाटन जरी फडणवीसांच्या हस्ते झाले असले तरी, हे नाट्यगृह एका वेगळ्या बॅनरमुळे चर्चेत आले आहे. या बॅनरवर अजित दादांच्या हस्ते भूमिपूजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण असा मजकूर आहे. त्यामुळे या बॅनरची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

    पुणेकरांसाठी महत्वाचे! मिळकतकराची बिले आजपासून ऑनलाइन उपलब्ध; सवलतीलाही मुदतवाढ
    ११ जुलै २०१४ साली अजित पवार यांनी या नाट्यगृहाचे भूमिपूजन केले होते. तेव्हापासून नाट्यगृहाचे काम सुरू होते. मात्र, आता तब्बल १० वर्षांच्या कालावधीनंतर या नाट्यगृहाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे अजित दादांनी केलेला वादा फडणवीसांनी पूर्ण केला अशा आशयाचे बॅनर या परिसरात झळकले आहेत.

    Pune News : मी मुलगा म्हणून काही करू शकलो नाही; पुण्यात MPSCचा अभ्यास करणाऱ्या विजयचा धक्कादायक शेवट!
    अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे जरी राजकीय विरोधक असले तरी त्यांची मैत्री राजकारणात पलीकडची असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. या बॅनर मधून पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांतील जवळीकीची चर्चा सुरू झाली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *